शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

बसमध्ये प्रवाशांची गर्दी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST

फिजिकल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अंबाजोगाई तालुक्यात दररोज निघणारी ...

फिजिकल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अंबाजोगाई तालुक्यात दररोज निघणारी रुग्णसंख्या पन्नास ते साठच्या घरात निघू लागली आहे. अशी स्थिती निर्माण झालेली असतांनाही शहरवासीयांकडून फिजिकल डिस्टन्सबाबत कसलेही गांभीर्य बाळगले जात नाही. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स पाळावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी केले आहे.

मजुरी महागली

अंबाजोगाई : सध्या शेतीमध्ये हरभरा, गहू, ज्वारी, करडई या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे गावोगावातील मजूर काढणीच्या कामात गुंतले आहेत. सर्व शेतकऱ्यांची काढणी मळणी एकाचवेळी सुरू झाली आहे. त्यामुळे मजूर मिळणे मोठ्या मुश्किलीचे काम झाले आहे. मागणी वाढल्याने अनेक मजुरांनी आपली मजुरीही मोठ्या प्रमाणात वाढवून घेतली आहे. वाढत्या मजुरीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. दर वाढूनही सोयोबीनची आवक घटली

अंबाजोगाई : अंबाजोागईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला पाच हजारांपेक्षा जास्त भाव मिळू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दर मिळाला. सोयाबीनचे दर वाढले असले तरी बाजारात सोयाबीनची आवक पाहिजे त्या प्रमाणात राहिली नाही. अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या भाववाढीची अपेक्षा आहे.

उसाची वाहतूक धोकादायक

अंबाजोगाई- अंबाजोगाई तालुक्यातील ऊस. अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, रांजणी येथील साई शुगर, रेणा सहकारी साखर कारखाना, अशा विविध कारखान्यांना शेतकऱ्यांचा ऊस विविध वाहनांद्वारे जात आहे. प्रामुख्याने ऊसाची वाहतूक ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात होते. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरचालक आपले वाहन रस्त्याच्या बाजूलाच लावत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. परिणामी यामुळे लहान मोठ्या अपघातातही मोठी वाढ झाली आहे.