शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पिके अजूनही पाण्यात, काढणी खर्च काढायचा तरी कसा...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:37 IST

सलग दोन वर्षे दुष्काळाची गेली. खरिपाचा हंगाम अपुऱ्या पावसामुळे कसाबसा पार पडेल असे वाटले होते. पण परतीच्या पावसाने जे हाती आले तेही गमावावे लागले.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा कहर : अंबाजोगाई तालुक्यात ९ हजार हेक्टर क्षेत्रातील खरिपाच्या नुकसानीचा प्रथम अंदाज

अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : सलग दोन वर्षे दुष्काळाची गेली. खरिपाचा हंगाम अपुऱ्या पावसामुळे कसाबसा पार पडेल असे वाटले होते. पण परतीच्या पावसाने जे हाती आले तेही गमावावे लागले. होत्याचं नव्हतं झालं साहेब. माझ्या तीन एकर सोयाबीनमध्ये पाणी शिरले आहे. आता हे सोयाबीन काढायचे म्हणले तर प्रति बॅग एकरी ४ हजार रुपये खर्च येतो. केवळ काढणीसाठी १२ हजार रुपये लागतात. पुन्हा उगवलेले तण नष्ट करण्यासाठीचा खर्च वेगळा. अशा स्थितीत उत्पादन तर काहीच नाही. खर्च कसा काढायचा, अशी व्यथा पूस येथील शेतकरी त्रिंबक ज्ञानोबा कचरे यांनी मांडली. दरम्यान तालुक्यातील पूस शिवारात शेती करणारे प्रकाश चोरमले यांचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अडीच एकरातील सोयाबीनचे पीक हातचे गेले. कौटुंबिक अडचणींसह मुलीच्या लग्नाबाबत ते चिंतेत होते.अंबाजोगाई तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रस्तुत प्रतिनिधीने पूस येथे जाऊन पाहणी केली. सोयाबीनचा मोठा पेरा असणाºया या परिसरात आभाळच फाटल्याचे निदर्शनास आले. तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीपाणी झाले. अनेकांच्या सोयाबीनमध्ये पाणी घुसले. पिके पाण्यावर तरंगू लागली. काढून ठेवलेली बाजरी व पिवळ्याच्या ढिगाºयाला आता कोंबे फुटली आहेत. पाऊस उघडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक उन्हात वाळवायला ठेवले. मात्र, पुन्हा पाऊस आल्याने आहे ते ढिगारेही भिजून कुजून जाऊ लागले आहेत. सोमवारी तिसºया दिवशीही अनेक शेतकºयांच्या शेतामध्ये पाणी तसेच होते. सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसले. आता हे सोयाबीन काढायचे कसे? हा मोठा प्रश्न भेडसावू लागल्याचे नरसिंग जोशी यांनी सांगितले. परिसरातील शेतांमध्ये लावलेला कापूसही भिजला. कापसाच्या आलेल्या बोंडात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने ही बोंडे फुगून त्या आतील कापसाच्या वाती झाल्याचे सांगताना महेश गौरशेटे भावनिक झाले.तालुक्यात ३० हजार शेतकºयांनी नुकसान भरपाई संदर्भात अर्ज दाखल केल्याचे तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी लोकमतला सांगितले. पाऊस पडून तीन दिवस झाल्यानंतर सोमवारी पूस येथील तलाठी गावात पीकपाहणी व पंचनाम्यासाठी हजर झाले होते. तलाठ्यांना गराडा घालून आमची पाहणी करा अशी मागणी करत शेतकºयांनी एकच गर्दी केली होती.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस