पाटोदा तालुक्यात तारीख २२ व २३ रोजी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे.
या पावसामुळे पारगाव घुमरा येथील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला तर काढण्यासाठी आलेल्या गहू व हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वीही बेनसुर ,रोहतवाडी थेरला शिवारात झालेल्या अवकाळी पावसाने जवळपास वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. मात्र या शेतकऱ्यांना अद्याप शासनाकडून मदत मिळालेली नाही.
पाटोदा हा बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुका असून अल्प सिंचन क्षेत्र आहे. दरवर्षी खरीप किंवा रबी या दोन हंगामा पैकी एक हंगाम शेतकऱ्यांच्या पदरात पडतो. यंदा तालुक्यात खरीप पिकांच्या काढणीच्या वेळी ही तालुक्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या नुकसान झाले झाले या खरीप काळात पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने हेक्टरी १० हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून जाहीर केले होते मात्र पाटोदा तालुक्यातील अधिकाऱ्यांनी शासनाला दिलेल्या अहवालात पाटोदा तालुक्यातील पिकांची नुकसान झाले नसल्याचा अहवाल दिला होता त्यामुळे तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते त्यानंतर खरीप पीकविमा तरी मिळेल याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ,महसुल व कृषि अधिकाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या अहवालाचा आधार घेत विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांना खरीप पिकापासून वंचित ठेवले त्यामुळे या सरकारकडून काही मदत मिळेल याची अपेक्षा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोडली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टीचे अनुदान, खरीपाचा पीकविमा, किंवा अवकाळी यापैकी कशाचाही लाभ पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे कितीही नुकसान झाले तरी शेतकऱ्यांनी या सरकारकडून काही मिळेल ही अपेक्षा सोडली आहे.
सखाराम पाटील , माजी सरपंच बेनसुर, ता पाटोदा
===Photopath===
230321\popat raut_img-20210323-wa0052_14.jpg
===Caption===
पाटोद्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले.