शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:31 IST

बीड : कोरोनाचा धोका वाढत असून आता तिसऱ्या लाटेचे संकट समोर उभे आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे ...

बीड : कोरोनाचा धोका वाढत असून आता तिसऱ्या लाटेचे संकट समोर उभे आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे लहान मुलांना कसलाही आजार असला अथवा थोडाही ताप आला की तो अंगावर न काढता तत्काळ डॉक्टरांना दाखवा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांना हाताळताना काळजी घेण्याची गरज आहे.

मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. पहिल्या लाटेत लॉकडाऊनसह नागरिकांनीही कोरोना नियम पाळल्याने रुग्णसंख्या कमी झाली. तसेच लहान मुलांनाही जास्त धोका झाला नाही, परंतु दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. आता तिसरी लाट येण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असून ती लहान मुलांसाठी अधिक धोकादायक ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या दृष्टीने आरोग्य प्रशासन उपाययोजना करत असले तरी पालकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. मुलांना हाताळताना काळजी घेण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कोरोना नियम पाळण्याचे आवाहनही प्रशासनाकडून केले जात आहे.

प्रत्येक सर्दी, ताप हा कोरोना नव्हे...

सर्दी, ताप, खोकला ही कोरोनाची लक्षणे आहेत. परंतु यात साधारण २०० विषाणू असतात. यातच कोरोनाचाही समावेश आहे. त्यामुळे ताप आला की घाबरून जाऊ नये. संशय दूर करण्यासाठी कोरोना चाचणी करून घ्यावी. निगेटिव्ह आल्यास वैद्यकीय तज्ज्ञांनाही उपचार करण्यास सोपे जाते. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये. मुलांकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन बालराेग तज्ज्ञांनी केले आहे.

आरोग्य विभागाकडून ६६० खाटा सज्ज

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात लहान मुलांसाठी ६६० खाटा तयार करण्यात आल्या आहेत. यात आयसीयूच्या १०० खाटा असून त्या बीड व अंबाजोगाईत असणार आहेत. इतर ५५० खाटा ऑक्सिजनच्या असून त्या उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात असणार आहेत. डॉक्टर, परिचारिका, ऑक्सिजन आदींची तयारी झाली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी सांगितले.

---

प्रत्येक सर्दी, ताप, खोकला म्हणजे कोरोना नव्हे, पण संशय दूर करण्यासाठी चाचणी करावी. तसेच मुलांना हाताळताना मास्कचा वापर व हात स्वच्छ धुवावे. त्यांना गर्दीत नेणे टाळावे. रोग प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी आहार चांगला ठेवावा. लसीकरण करून घ्यावे. थोडीही लक्षणे अथवा कुठलाही आजाराचा संशय आल्यास डॉक्टरांना दाखवावे.

डॉ. संजय जानवळे, बालरोग तज्ज्ञ, बीड

---

310721\31_2_bed_8_31072021_14.jpg

डॉ.संजय जानवळे, बालरोग तज्ज्ञ बीड