बीड : तालुक्यातील म्हाळसजवळा येथील वैभव राऊत यांनी सोमवारी सावकारांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी शिवसेना उपजिल्हा प्रमुखासह सहा जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे याच्यासह त्याचे वडील हरिभाऊ खांडे, भाऊ गणेश व नामदेव आणि नगरसेवक संतोष गायकवाड, अमोल गायकवाड यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. वैभव यांनी मग्रारोहयोतील घोटाळा उघडकीस आणला होता. तसेच ग्रामपंचायत निवडणूक लढणार होता. त्यांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव आणला जात होता. व्याजाने दिलेले पैसे परत करूनही त्याला मानसिक त्रास दिला जात होता. यालाच कंटाळून सोवमारी सकाळी राऊत यांनी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात ठिय्या मांडला. सायंकाळी उशिरा पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. सायंकाळी शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. गुन्हा दाखल असलेले सहाही आरोपी फरार आहेत. पोलीस राजकीय दबावामुळे आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप वैभव यांचे नातेवाईक करीत आहेत.लवकरच सर्वांना अटकआरोपींना पकडण्यासाठी दोन पथके नियुक्त केली आहेत. लवकरच सर्वांना अटक केली जाईल, असे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी सांगितले.
शिवसेना उपजिल्हा प्रमुखासह सहा जणांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:28 IST
बीड तालुक्यातील म्हाळसजवळा येथील वैभव राऊत यांनी सोमवारी सावकारांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी शिवसेना उपजिल्हा प्रमुखासह सहा जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिवसेना उपजिल्हा प्रमुखासह सहा जणांविरूद्ध गुन्हा
ठळक मुद्देवैभव राऊत आत्महत्या प्रकरण पोलिसांनी आरोपींना पाठिशी घातल्याचा आरोप