शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांनी केजचे ...

ठळक मुद्देकेजच्या पोलीस निरीक्षकांबद्दल बीडमधील ‘हल्लाबोल’ सभेत उच्चारले अपशब्द

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांनी केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारून बदनामी केली. आपल्या नेत्यांसमोर ओघाच्या भरात बोलणे फड यांना चांगलेच महागात पडले असून शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

भाजप, शिवसेना सरकारविरोधात राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा राज्यभर सुरू आहे. १७ जानेवारी रोजी ही यात्रा बीड जिल्ह्यात होती. बुधवारी दुपारी पाटोदा येथे सभा झाल्यानंतर रात्री बीड शहरातील सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स परिसरात सभेचे आयोजन केले होते. या सभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक, माजी मंत्री तथा आ.राजेश टोपे, चित्रा वाघ, संदीप क्षीरसागर, रेखा फड यांची उपस्थिती होती.

याच सभेत रेखा फड यांचेही भाषण झाले. बोलत असताना त्यांनी गुन्ह्यांचा तपास लावत नसल्याने आपण पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना वारंवार धमक्या दिल्या आहेत. तसेच केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे विकाऊ असल्याचे सांगत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. भर सभेत पोलीस अधिकाºयांबद्दल असे अपशब्द वापरल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत चौकशी करून शुक्रवारी पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शेतक-यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सरकारविरोधात भांडत असताना रेखा फड यांनी पोलिसांबद्दल अपशब्द उच्चारून नवा वाद निर्माण केला आहे. सध्या पोलीस दलात त्यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास बीड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड या करीत आहेत.तपास सुरू आहेतपास अधिकारी मा.न्यायालयाला पत्र लिहून प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात परवानगी मागतील. न्यायालयाचे आदेश मिळताच आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल. केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या फिर्यादीवरून रेखा फड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या फिर्यादीत पोलीस अधीक्षक यांना धमक्या दिल्याचाही उल्लेख आहे, हे सुद्धा खरे आहे. आमचा तपास सुरू आहे. लवकरच तो पूर्ण करू.- सय्यद सुलेमानपोलीस निरीक्षक,शहर पोलीस ठाणे, बीडवैयक्तिक बदनामी केल्यामुळे फिर्याददीड महिन्यांपूर्वी घडलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यासंदर्भात रेखा फड यांनी संपर्क केला होता. हे प्रकरण गुंतागुंतीचे असले तरी आमचा तपास सुरूच आहे. आरोपीचे लोकेशन मिळत नसल्याने तो अटक नाही. त्याने जामीनसाठी सेशन व उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु आम्ही त्याची जामीन होऊ दिली नाही. आम्ही कामच करीत नाहीत, हे पुराव्यानिशी सिद्ध करावे. माझी वैयक्तिक बदनामी केल्यामुळे रेखा फड यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.- शिरीष हुंबेपोलीस निरीक्षक, केज