शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

फाटक्या, जीर्ण नोटांमुळे ग्राहकांसह व्यावसायिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

अंबाजोगाई : नोटबंदीनंतर अस्तित्वात आलेल्या १०, २० आणि ५० रुपयांच्या फाटक्या, तुटक्या, चिटकवलेल्या जीर्ण नोटांचे प्रमाण सध्या वाढले आहे. ...

अंबाजोगाई : नोटबंदीनंतर अस्तित्वात आलेल्या १०, २० आणि ५० रुपयांच्या फाटक्या, तुटक्या, चिटकवलेल्या जीर्ण नोटांचे प्रमाण सध्या वाढले आहे. या नोटा व्यवहारात आल्यानंतर काही दिवसांतच वापरायोग्य राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, व्यावसायिकांची मोठी पंचाईत झाली आहे.

नव्याने अस्तित्वात आलेल्या १० व ५० रुपयांच्या नोटा अल्पावधीतच जीर्ण होत असल्याने ग्राहक व व्यावसायिकांना त्या सांभाळणे कठीण झाले आहे.

कोणतीही नोट फाटल्यावर तिला चिटकवून व्यवहारात आणताना ग्राहक व व्यापारी या दोन्ही वर्गांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. बऱ्याच वेळा फाटक्या, जीर्ण नोटांवरून बाजारपेठेत ग्राहक व व्यापारी यांच्यात हमरीतुमरीच्या घटना घडताना दिसतात. त्यातच बँकेमध्येही फाटक्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. फाटक्या नोटांमुळे कमी उत्पन्न गटातील अनेकांचे आर्थिक व्यवहार रखडतात. जीर्ण नोटा चलनात न आल्याने काहींना नुकसानही सोसावे लागते.

स्टेट बँकेत जीर्ण नोटा बदलण्याची व्यवस्था असली तरी सतत असलेली मोठी गर्दी लक्षात घेता सामान्य नागरिक त्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे प्रशासनाने या जुन्या व फाटक्या नोटा बदलून देण्याची व्यवस्था प्रत्येक बँकेत करावी, तरच या समस्येवर तोडगा निघू शकतो.

चिल्लर भरपूर झाली

जुन्या, फाटक्या व चिटकवलेल्या जीर्ण नोटांना पर्याय म्हणून १,२,५,१० रुपयांची चिल्लर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वापरात असल्याचा प्रकारसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आहे ती चिल्लर ग्राहकांना बळजबरीने दिली जाते. त्यामुळे चिल्लर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

१० रुपयांचा रोकडा डोकेदुखी

१० रुपयांचा रोकडा चलनात असतानाही बाजारपेठेत तो रोकडा स्वीकारला जात नाही. तो चलनातून बाद झाला असल्याचे अनेक व्यापारी सांगतात. मात्र, आजही हा रोकडा कुणाला दिला तर तो कोणीही स्वीकारत नाही. त्यामुळे ज्याच्याकडे हे रोकडे उपलब्ध आहेत, ते कोणी घेतच नसल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.