शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई नगर परिषदेवर माकपचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:48 IST

कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली शिकलकरी समाज व वंचित घटकातील शेकडो गोरगरीब, मजूर लोकांनी सोमवारी रोजी नगर परीषद कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : ‘शहर व परिसरात राहणारा शिकलकरी समाज व वंचित घटकातील गोरगरीब लोक यांना अंबाजोगाई येथील सरकारी जमिनीवर स्थलांतरीत करून कायमचे घर देण्यात यावे, सर्व्हे नं.५१५ मधील न.प. मालकीची जागा ताबडतोब ताब्यात घेवून त्यावरील तसेच मुख्य रस्त्यांवरील अतिक्र मणे हटवा, सर्व गलिच्छ वस्त्यांची स्वच्छता करा, शहराची अंतर्गत पाईप लाईन बदलून आठवड्यातून दोनदा पिण्याचे पाणी द्या या व इतर मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुनही दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली शिकलकरी समाज व वंचित घटकातील शेकडो गोरगरीब, मजूर लोकांनी सोमवारी रोजी नगर परीषद कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.शासकीय जमीनीवर बेघरांना शासकीय ‘सर्वांसाठी घरे’ योजनेतून घरे मिळावीत या प्रमुख व इतर ६ मागण्यांसंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.बब्रुवाहन पोटभरे हे सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे.विविध प्रकारे हे प्रश्न सोडून घेण्यासाठी कॉ.पोटभरे हे प्रयत्न करीत आहेत.निवेदनाद्वारे नगर परिषद प्रशासनास इशारा दिला होता. याबाबत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना कळविले होते. त्यानुसार सोमवारी शिकलकरी समाज व वंचित घटकांतील शेकडो स्त्री-पुरूष, वयोवृद्ध नागरिक व लहान मुले, गोरगरीब लोकांनी रणरणत्या उन्हात मोर्चा काढून नगर परिषदेसमोर निदर्शने केली. घोषणा दिल्या. कार्यालयात घुसून घेराव घातला. याप्रश्नी प्रशासनाने या लोकांना तात्काळ न्याय द्यावा अन्यथा २५ जून नंतर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल. झालेल्या परिणामांना नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी यावेळी दिला आहे. तर मुख्याधिकाऱ्यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदन न.प.अभियंता कस्तुरे यांनी स्वीकारले.सदरील निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, पूनमसिंग टाक, छायाबाई तरकसे, गोरखसिंग भोंड, अस्मिता ओहाळ, दीपकसिंग गोके, पूजा मोरे, वीरसिंग टाक, अनिल ओहाळ, अशोक ढवारे, तेजासिंग गोके, मीरा पाचपिंडे, मीरा जोगदंड आदींसह इतरांच्या स्वाक्ष-या आहेत. मोर्चात सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील शिकलकरी समाज, मिलींदनगर व येल्डा रोड परिसरातील शेकडो बेघर कुटुंबे, वंचित समाज बांधव हे सहभागी झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा दरम्यान, आंदोलकांनी घोषणाबाजी करीत नगर परिषद कार्यालय परिसर दणाणून सोडला होता.

टॅग्स :Morchaमोर्चाCommunist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)civic issueनागरी समस्या