शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात नगराध्यक्ष विरुद्ध नगरसेवक संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:52 IST

माजलगाव येथील नगर परिषदेचे अध्यक्ष हे मनमानी स्वरुपाचा कारभार करीत असून, कुठल्याही प्रक्रियेमध्ये नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही तसेच मागील झालेल्या सभेचा वृत्तांत नगरसेवकांना दिला जात नाही, वेळेवर सभा घेतली जात नाही, असा आरोप करीत सत्ताधारी नगरसेवकांनीच पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकल्यामुळे सभा रद्द करावी लागली. त्यामुळे अध्यक्ष विरुध्द नगरसेवक असा संघर्ष पेटल्याचे पाहवयास मिळत आहे.

ठळक मुद्देइन कॅमेरा सभेची मागणीसत्ताधारी नगरसेवकांनीच टाकला सर्वसाधारण सभेवर बहिष्कार

माजलगाव : येथील नगर परिषदेचे अध्यक्ष हे मनमानी स्वरुपाचा कारभार करीत असून, कुठल्याही प्रक्रियेमध्ये नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही तसेच मागील झालेल्या सभेचा वृत्तांत नगरसेवकांना दिला जात नाही, वेळेवर सभा घेतली जात नाही, असा आरोप करीत सत्ताधारी नगरसेवकांनीच पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकल्यामुळे सभा रद्द करावी लागली. त्यामुळे अध्यक्ष विरुध्द नगरसेवक असा संघर्ष पेटल्याचे पाहवयास मिळत आहे.

माजलगाव नगरपालिकेचे सत्तांतर होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे. या दरम्यान केवळ एकच सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सर्वसाधारण सभा ही किमान तीन महिन्यात एकदा व्हायला हवी, मात्र मागील सात महिन्यांपासून सर्वसाधारण सभा झालेली नाही. मागे जी सभा झाली त्यात घेण्यात आलेल्या ठरावांची व प्रोसिडींगची मागणी वारंवार नगरसेवक करीत असताना देखील ती दिली जात नाही. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी माजलगाव नगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी आंदोलन केले होते. त्याच बरोबर आयुक्तांनाही भेटुन या बाबत तक्रार केली होती. पंधरा दिवसांपुर्वी जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकाºयांना दोन दिवसांत विरोधक नगरसेवकांनी मागितलेली माहिती देण्यात यावी, असे आदेश दिले. मुख्याधिकाºयांनी मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली.

नगराध्यक्षांच्या मनमानी विरुध्द दोन महिन्यांपूर्वी सत्ताधारी नगरसेवकांनी येथील आ. आर. टी. देशमुख यांची भेट घेऊन नगराध्यक्षांच्या तक्रारींचा पाढा वाचला होता. यात आमदारांनी मध्यस्थी करुन प्रकरण शांत केले होते. मात्र, त्यानंतरही नगराध्यक्षांची मनमानी सुरुच राहिल्याने शुक्रवारी पालिकेच्या कार्यालयामध्ये बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेवर विरोधी नगरसेवकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी देखील बहिष्कार घातला. त्यामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की नगराध्यक्षांवर ओढवली.

अध्यक्ष अन् नगरसेवकांच्या वादातमाजलगाव शहराचा विकास सहाल चाऊस हेच करु शकतात, या अपेक्षेवर जनतेने चाउस यांना निवडून दिले. नगराध्यक्ष होऊन त्यांना जवळपास एक वर्ष उलटत असताना नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या वादात माजलगाव शहराचा विकास खुंटला आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भाव, रस्त्यांची दुरवस्था, तुबलेल्या नाल्या आदींमुळे जनता मात्र होरपळून निघाली आहे.