शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनामुळे सोन्यासारखी फळेही मातीमोल झाल्याने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 20:13 IST

राज्य शासनाने हमीभावाने फळं खरेदी करावीत : अशोक लोढा

ठळक मुद्देशासनाने दिलासा द्यावाफळ बागेचे नियोजन ठप्प

बीड :  सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे फळबागेत पिकवलेली सोन्यासारखी फळं बागेत गळून कवडीमोल होत आहेत. कोरोनाच्या आर्थिक संकटात सापडलेल्या फळ उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने हमी भावाने शेतकºयांची फळे खरेदी करावीत, अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी केली आहे.

अनेक नैसर्गिक संकटातून वाचवत पिकवलेल्या फळबागा कोरोनाच्या संकटाने उद्ध्वस्त झाल्या आहेत.  लाखो रु पये एकरी लागवड, मशागत खर्च करून मोठ्या हिमतीने बागा जोपासल्या दोन पैसे मिळतील या आशेने स्वप्न पाहणाऱ्या शेतकºयांच्या स्वप्नावर कोरोनाने पाणी फिरवले. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून देशासह राज्यभरात लॉकडाऊन संचारबंदी चालू आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले. रस्ते निर्मनुष्य झाले बाजारपेठा ओस पडल्या. खरेदी विक्र ी मंदावली. कारखाने बंद झाली रस्त्यावरचे फळविक्र ेते गायब झाले. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी पिकवलेल्या द्राक्ष, पेरू, चिकू आदी बागांमधील फळांची विक्र ी होत नसल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. 

फळबागेचे नियोजन ठप्प  मागील उन्हाळ्यात तीव्र दुष्काळ तर पावसाळ्यात महाभयंकर पूर  तर अलीकडेच अतिवृष्टी एक ना अनेक अडचणींवर मात करत काबाडकष्टाने लाखो रु पये मशागतीवर खर्च करून मोठ्या हिंमतीने शेतकरी बांधवांनी फळबागा जोपासल्या. दरम्यान कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन संचारबंदी लागू झाल्याने फळ बागेचे नियोजन ठप्प झाले. हातातोंडाशी आलेली फळबाग बाजार पेठेपासून वंचीत राहिली.ऐन फळबागांच्या हंगामांमध्ये कोरोनाच्या संकटामुळे फळ उत्पादक शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले.

राज्य सरकारने दिलासा द्यावाआर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकरी बांधवांसाठी  केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी घोषणा केल्याप्रमाणे राज्य शासनाने शेतकºयांची  फळे हमीभावाने खरेदी करावीत. खरेदीसाठी अर्धा वाटा केंद्र सरकार उचलण्यास तयार आहे. राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेत ही  फळ खरेदीची योजना  अमलात आणली तर राज्यातील फळ उत्पादक शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.  याबाबत आपण लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे पाठवले असून यावर निश्चितपणे सकारात्मक निर्णय होऊन शेतकरी बांधवांना न्याय मिळेल अशी अपेक्षा जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी व्यक्त केली आहे.