शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एकोणतीस गावात कोरोना शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:31 IST

विजयकुमार गाडेकर शिरूरकासार : तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा अवघा चारवर आला असताना मोठा दिलासा मिळाला होता; मात्र हे समाधान अभ्रछायासारखे ...

विजयकुमार गाडेकर

शिरूरकासार : तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा अवघा चारवर आला असताना मोठा दिलासा मिळाला होता; मात्र हे समाधान अभ्रछायासारखे ठरले आणि वीस ते सत्तावीस जुलैपर्यंतच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार तो १९२ वर गेला तर तिथून पुढे एकतीसपर्यंत हा आकडा वाढत जाऊन ३११ वर गेला असल्याने ही चिंताजनक बाब बनत आहे; मात्र प्राप्त अहवालानुसार या सप्ताहात तब्बल २९ गावांतून कोरोना गायब झाला असल्याचे समाधानदेखील आहे.

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून कोरोनाबाबत मिळालेल्या माहितीनुसार साठ गावांत सत्तावीस तारखेपर्यंत १९२ रुग्ण होते. तो आकडा पुढे चारच दिवसांत ३११ वर गेला. २९ गावांत कोरोना शून्यावर तर पाच गावात या कालावधीत एक रुग्ण सापडला असून सात गावात दोन रुग्ण आढळून आले तर उर्वरित गावांत तीनहून अधिक रुग्ण सापडले. शिरूर शहरात बारा बाधित रुग्ण निघाले.

तालुक्यात सर्वाधिक आकडा माळेवाडी या गावांत २८ तर दुसऱ्या क्रमांकात भानकवाडीत २४ कोरोना रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

चार दिवसांत शंभरी गाठली

२८ ते ३१ जुलै या चारच दिवसात कोरोनाने शंभरी गाठल्याने आरोग्य विभागासह सर्वांनाच चिंतेची बाब बनली आहे.

कोरोनाबाबत निष्काळजी भोवणार

सध्या शहरासह अन्य भागातदेखील कोरोना नियमावलीचे फारसे गांभिर्य दिसून येत नाही. सर्वच स्तरातून नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे. ही गोष्ट घातकी ठरणार आहे. अजूनही सावध होण्याची वेळ गेलेली नाही. स्वत: सुरक्षित राहून इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे.

वीस ते सत्तावीस जुलैपर्यंत कोरोना शून्य गाव

तालुक्यात वीस ते सत्तावीस जुलैपर्यंत खरगवाडी, झापेवाडी, खोलेवाडी, आव्हळवाडी, उकांडा (च.),वंजारवाडी, हाटकरवाडी, लोणी, कमळेश्वर धानोरा, पौंडूळ ३, राक्षसभुवन ,तरगव्हण ,रायमोह ,वरंगळवाडी ,बरगवाडी ,पाडळी ,आनंदगाव ,बोरगाव , टेंभुर्णी ,नागरेवाडी ,सावरगाव,

शिरापूर धुमाळ ,येवलवाडी ,आनंदवाडी ,माळेगाव च. शिंगारवाडी, पांगरी, जाटवड व डोळेवाडी या गावात कोरोना शून्य असल्याचे अहवालात दिसून येते.