शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

corona virus : परळीतील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर ३१ मार्चपर्यंत राहणार बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 19:44 IST

बीड जिल्ह्यातील २६ देवस्थाने राहणार बंद  

ठळक मुद्दे मंदिर व मंगलकार्यालयात होणारे विविध कार्यक्रम, लग्नसमारंभ रद्द करण्याचे आदेशदेशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या संख्येत दोन दिवसापासून घट

- संजय खाकरे

परळी : देश व राज्यात  कोरोना विषाणूचा फैलाव होत असल्याच्या  पार्श्वभूमीवर देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर भाविकांसाठी ३१ मार्चपर्यंत बंद असेल अशा सूचना बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमवारी दिल्या आहेत. तसे पत्र सायंकाळी 6.30 च्या सुमारास मंदिर सचिवास प्राप्त झाले. दरम्यान, मंदिरातील दररोजची पूजा नियमित होणार असून त्यासाठी केवळ पुजारीच उपस्थित राहणार आहेत.

सोमवारी  प्रभू वैद्यनाथांच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी होती. राज्य व परराज्यातून येथे श्री  वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या गेल्या दोन दिवसापासून देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घटली आहे. श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टने येणाऱ्या भक्तांची मंदिरात स्वच्छता करून विशेष खबरदारी घेतलेली आहेच.  तसेच २  एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला गीत रामायण हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. येथील वैजनाथ मंदिरात दररोज सकाळी दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते व सायंकाळच्या वेळी शहरातील भाविक  मोठ्या प्रमाणात येतात. तसेच रात्री सव्वा नऊच्या सुमारास दररोज आरतीला भक्तांची गर्दी होते ही भक्तांची गर्दी टाळण्याच्या सूचना बीडच्या जिल्हा प्रशासनाने केलेल्या आहेत. 

परंतु वैद्यनाथाला दररोज होणारी आरती पूजा आता फक्त पुजारीच करतील .आरतीला भक्तांची गर्दी नसेल अशी काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी बीड यांनी सूचित केले आहे तसेच ३१ मार्चपर्यंत मंदिर व मंगलकार्यालयात होणारे विविध कार्यक्रम, लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. भाविक भक्तांना प्रवेश बंद असेल, असे लेखी आदेश सायंकाळी  जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशाचे पालन केले जाईल अशी माहिती श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली

जिल्ह्यातील २६ देवस्थाने राहणार बंद  कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतील योगेश्वरी देवी मंदीर, परळीतील वैद्यनाथ मंदीर यासह २६ देवस्थाने भाविकांच्या दर्शनासाठी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोनाBeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड