शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : एचआरसीटी स्कोअर २४, ऑक्सिजन लेव्हल ५०, तरीही वृद्धाची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 16:42 IST

corona virus in Beed जिल्हा रूग्णालयात ३८ दिवस उपचार घेतल्यानंतर वृद्धास रुग्णालयातून डिस्चार्ज 

ठळक मुद्देडॉक्टर, परिचारीकांसह वृद्धाचे वॉर्डात जावून सीएसने केले स्वागत

- सोमनाथ खताळ बीड : एचआरसीटी स्कोअर २४, ऑक्सिजन लेव्हल ५० वर आली. कोमॉर्बिड आजार असल्याने मनात भिती. परंतू रूग्णाची जिद्द आणि आरोग्यकर्मिंच्या परिश्रमाच्या बळावर ७२ वर्षीय वृद्धाने कोरोनावर मात केली. ३७ दिवस उपचार घेऊन ३८ व्या दिवशी वृद्धाला सुटी देण्यात आली. हे समजताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी वॉर्डात जावून वृद्ध व रूग्णसेवा देणाऱ्यांचे स्वागत केले. यामुळे सरकारी रूग्णालयाबद्दल विश्वास निर्माण झाला असून आरोग्यकर्मिंचे मनोबलही उंचावले आहे.

बीड तालुक्यातील घोडका राजूरी येथील ७२ वर्षिय वृद्धाला लक्षणे असल्याने ९ मे रोजी कोरोना चाचणी केली. १० मे रोजी ते पॉझिटिव्ह असल्याचे समजले. आगोदरच दमा असल्याने नातेवाईक घाबरले. तपासणी केली असता एचआरसीटी स्कोअर २४ आला तर ऑक्सिजन लेव्हलही ५० होती. या कठीण परिस्थितीतही डॉक्टरांनी परिश्रम घेणे सोडले नाही. तर या वृद्धानेही घाबरून न जाता जिद्दीने कोरोनाचा सामना केला. उपचारादरम्यान त्यांना बायपॅप आणि चार रक्ताच्या पिशव्या लागल्या. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. अखेर ३७ दिवस उपचार घेऊन हे वृद्ध शुक्रवारी कोरोनामुक्त झाले. त्यांचे स्वागत करून जिल्हा रूग्णालयातून सुटी देण्यात आली. यामुळे सरकारी रूग्णालयातही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उपचार मिळत असल्याचा संदेश समाजात गेला आहे.

कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वागतरूग्ण गंभीर असतानाही त्याच्यावर योग्य उपचार आणि काळजी घेत त्याला नवे जीवन दिले म्हणून उपचार करणाऱ्या सर्वच डॉक्टर, परिचारीका, वॉर्डबॉयचे स्वागत करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे वॉर्डात पोहचले. आगोदर कोरोनामुक्त झालेल्या वृद्धाचा पुष्पगुच्छ देऊन व नंतर उपचार करणाऱ्या सर्वांचाच फुल देऊन स्वागत केले.

या टिमने केले उपचारजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ.सुखदेव राठोड, डॉ.आय.व्ही.शिंदे, डॉ.अशोक हुबेकर, डॉ.सचिन आंधळकर, मेट्रन रमा गिरी, संगिता दिंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिशियन डॉ.रेवडकर, डॉ.भरत दुरगुडे, डॉ.स्वप्नील बडजाते, डॉ.बाळासाहेब टाक, डॉ.विशाल कोटेचा, डॉ.रूपाली बंड, वॉर्ड इन्चार्ज कुडके, परिचारीका मिरा मुंडे, स्वप्नाली तळेकर, अश्विनी सावंत, प्रियंका जाधव, आकाश भोसले, कविता लाड, प्रियंका शेळके, राजकन्या देवकुळे, राजपूत, खरमाटे यांनी ३७ दिवस उपचार करून वृद्धाला कोरोनामुक्त करून घरी पाठविले.

गैरसमज दूर करून उपचार घ्यावेतजिल्हा रूग्णालयात गुणवत्तापूर्ण व वेळेत उपचार होतात. ७२ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात करून आमच्या परिश्रमाची पावती दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारी यंत्रणेबद्दलच गैरसमज दूर करून उपचार घ्यावेत. ही बाब कौतुकास्पद असल्याने सर्वांचेच स्वागत वाॅर्डात जावून केले. मला माझ्या टिमचा अभिमान वाटत आहे. यापुढेही असेच रूग्णसेवा होत राहिल.- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

टॅग्स :Beedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या