शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : परळीकरांना दिलासा ! ५० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उपजिल्हा रुग्णालयात कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 18:18 IST

corona virus : रुग्णालयात 50 रुग्णांना एकाच वेळी सेवा देण्याच्या प्रमाणात पॅरामेडिकल स्टाफ उपलब्ध करण्यात आला आहे.

परळी : येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत 50 ऑक्सिजन बेडचे  कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. येथे ऑक्सिजनचे 25 बेड कार्यान्वित करण्यात आले असून, आणखी 25 बेडला ऑक्सिजन सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हे सेंटर 12 दिवसांपूर्वी केवळ 48 तासात पालकमंत्री मुंडे यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने उभारले तथापि ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध न झाल्याने हे सेंटर सुरू करण्यास विलंब लागला होता..लोकमत ने या संदर्भात वृत  प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले आणि अखेर हे सेंटर सुरू झाले 

सोमवारी ना. धनंजय मुंडे यांनी  वॉर्डांमध्ये जाऊन उपलब्ध सुविधांची पाहणी केली. रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेत कोणताही रुग्ण सिरीयस होण्याआधी इथेच योग्य उपचार मिळावेत, यासाठी गरज भासल्यास परळीतील खाजगी डॉक्टर्सची काही तासांसाठी सेवा उपलब्ध करून घेऊ असे यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी सांगितले. यावेळी  बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते,  परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्षद शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश कुर्मे,  आंबाजोगाई चे  उप विभागीय पोलीस आधिकारी सुनील जायभाये, परळी तालुका  आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण मोरे, नायब तहसीलदार  बाबुराव रुपनर  उपस्थित होते. 

रुग्णालयात 50 रुग्णांना एकाच वेळी सेवा देण्याच्या प्रमाणात पॅरा मेडिकल स्टाफ उपलब्ध करण्यात आला आहे, त्यांना आवश्यक सामग्री, पीपीई किट व अन्य साहित्याची कमतरता भासणार नाही, याची काळजी घ्यावी; असे निर्देश डॉ. गित्ते यांना दिले. तर रुग्णालयात सोमवार पासून 25 रुग्ण दाखल होतील त्यांच्या नातेवाईकांची गर्दी होऊ नये यासह अन्य सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश ना.मुंडे यांनी यावेळी पोलीस उपअधीक्षक जायभाये यांना दिले. तसेच सर्व डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ व अन्य कर्मचाऱ्यांना सेवा कार्यासाठी ना.मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड