शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus In Beed : भय इथले संपत नाही...अंबाजोगाईत ३० मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 17:47 IST

30 patients death due to Corona virus आजपर्यंतची सर्वात मोठी संख्या,कोरोनाचा कहर सुरूच

ठळक मुद्दे२८ जणांना अग्निडाग तर दोघांचा दफनविधी.

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला असून विशेषतः अंबाजोगाई तालुक्यात अधिक प्रादुर्भाव आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांची संख्याही वाढत असल्याने भयावह परिस्थिती आहे.  शनिवार व रविवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या ३० रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. २८ जणांना अग्नीडाग तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला.दिवसेंदिवस कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालल्याने भय इथले संपत नाही,अशीच स्थिती झाली आहे.

दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे. बीड जिल्ह्यात दररोज हजारांपेक्षाही अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत.अंबाजोगाई तालुक्यात फक्त एप्रिल महिन्यात चार हजारांपेक्षा ज्यास्त रुग्ण निष्पन्न झाले आहेत. तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.  सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये मिळून हजार पेक्षाही अधिक कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, शेकडो रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र दिलासादायी असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे. शनिवार आणि शनिवार  असे दोनच दिवसात एकूण ३० मृतदेहांवर अंबाजोगाई नगर पालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. 

आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णांचा ओढा अंबाजोगाईकडे शेजारच्या सर्व तालुक्यातून रुग्ण अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीचे कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. हि दोन्ही ठिकाणी कोविड रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दरम्यान, या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराची जबाबदारी अंबाजोगाई नगर पालिकेची आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणारे मृत हे एकट्या अंबाजोगाई तालुक्यातील नसून त्यापैकी अनेकजण आसपासच्या तालुक्यातील रहिवासी असतात असे संबंधितांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडDeathमृत्यू