शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : हद्द झाली ! आरोग्य कर्मचाऱ्याने नातेवाईकांना देण्यासाठी चोरून कोरोना लस आणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 19:52 IST

Corona Vaccine : लस देण्यासाठी आणलेले नातेवाईक आणि संबंधित खेडकर नामक कर्मचाऱ्याने घातलेला गोंधळ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ठळक मुद्देविठ्ठल खेडकर हे आरोग्य कर्मचारी कर्जत तालुक्यातील चापडगाव आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. लसची एक बॉटल चोरून कडा आरोग्य केंद्रात आले. येथे आपल्या सहा नातेवाईकांना लस देण्यास सांगितले.

- सोमनाथ खताळ

बीड : अहमदनगर जिल्ह्यातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांना देण्यासाठी चक्क आरोग्य केंद्रातील लस चोरुन आणल्याचे समोर आले आहे. ही लस आष्टी तालुक्यातील कडा आरोग्य केंद्रात देताना हा प्रकार उघड झाला. आता या आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकाराने मात्र लसीचा काळाबाजार कसा होत, हे उघड झाले आहे. 

विठ्ठल खेडकर हे आरोग्य कर्मचारी कर्जत तालुक्यातील चापडगाव आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. शनिवारी त्यांनी लसची एक बॉटल चोरून कडा आरोग्य केंद्रात आले. येथे आपल्या सहा नातेवाईकांना लस देण्यास सांगितले. परंतु हा प्रकार गंभीर असल्याने कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना सांगितला. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांना सांगितला. यावर त्यांनी तात्काळ या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

दरम्यान, लस देण्यासाठी आणलेले नातेवाईक आणि संबंधित खेडकर नामक कर्मचाऱ्याने घातलेला गोंधळ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानिमित्ताने आरोग्य कर्मचरायांकडून होत असलेला गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. 

नगरचे जिल्हाधिकारी म्हणाले, डिएचओशी बोलाया गंभीर प्रकाराबाबत अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना संपर्क केला. यावर त्यांनी ही बाब जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी बोला म्हणत फोन डॉ. सांगळे यांच्याकडे दिला. ते म्हणाले, ही बाब गंभीर आहे. याची लगेच चौकशी करतो. हे जर खरं असेल तर तात्काळ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मी पालकमंत्री यांच्या बैठकीत आहे, नंतर सविस्तर बोलतो, असे म्हणत फोन ठेवला.

पाठीशी घातले जाणार नाहीकडा आरोग्य केंद्रातिल प्रकार समजला आहे. ही बाब गंभीर असून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. असे कोणी चूक करत असेल तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही.- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसBeedबीड