शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरण; ज्येष्ठांनो घरबसल्या घ्या अपॉइंटमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:32 IST

बीड : कोरोना लसीचा तुटवडा असला तरी लस आल्यावर गोंधळ उडू नये, यासाठी बीड आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. ...

बीड : कोरोना लसीचा तुटवडा असला तरी लस आल्यावर गोंधळ उडू नये, यासाठी बीड आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. एक वेब लिंक व ॲप तयार करून घरबसल्या ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्याची सुविधा ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी लस येण्याची प्रतीक्षा कायम आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा पुरवठा बंद आहे. केवळ दुसरा डोस असणाऱ्या लोकांना लस दिली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख लोकांना लस दिली असली तरी अद्यापही लाखो लोक यापासून वंचित आहेत. शासनाकडून लसीचा मुबलक पुरवठा होत नसल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. असे असले तरी काही दिवसांनी लसीचा पुरवठा होणार आहे. यावेळी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी आराेग्य विभागाने एक वेब लिंक तयार करून घरबसल्या ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यात वेळ, टोकन क्रमांक आणि लसीकरण केंद्राची माहिती मिळणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी याचे नियोजन केले आहे.

अशी मिळवा ऑनलाईन अपॉइंटमेंट

सुरुवातीला गुगलवर जाऊन http://ezee.live/Beed Covid 19 Registration ही लिंक ओपन करा. त्यानंतर आपले पूर्ण नाव, वय, मोबाईल क्रमांक, लिंग, पत्ता अचूक टाकावा. नंतर लसीकरण केंद्र निवडावे. आपण पहिला की दुसरा डोस घेणार आहेत, यावर क्लिक करावे. नंतर शब्द व अंकाचा कोड खालील बॉक्समध्ये टाकावा. शेवटी पुन्हा नोंदणी करणाऱ्याचा मोबाईल क्रमांक टाकून सबमीट करावे. नंतर ‘डाटा सबमिटेड सक्सेसफुली’ असे समोर दिसेल. त्याचा स्क्रीनशॉट अथवा फोटो काढून जपून ठेवावा. यात टोकन क्रमांक आणि लसीकरण केंद्राचे नाव असेल. तसेच नीडली ॲप डाऊनलोड केले असल्यास लसीचे स्टेटस समजणार आहे. लस उपब्ध होताच मेसेज येईल.

१८ ते ४४ वयाेगटासाठी ही सुविधा नाही

ही नोंदणी सुविधा केवळ ४५ वर्षांवरील लोकांसाठी आहे. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना आरोग्य सेतू अथवा कोविन ॲपद्वारेच ऑनलाईन अपॉइटमेंट घ्यावी लागणार आहे.

...

लसीचा तुटवडा आहे. लस उपलब्ध होताच लोक गर्दी करतात. ते टाळण्यासाठी ही लिंक तयार केली आहे. यातून घरबसल्या ऑनलाईन अपॉइंटमेंट घेता येईल. सर्व माहिती योग्य भरल्यास आपल्याला नोंदणीकृत मोबाईल व व्हॉट्सॲपवर संदेश पाठविला जाईल. सर्वांनी सहकार्य करून गर्दी टाळावी. ही सुविधा केवळ ४५ वर्षांवरील लोकांसाठी आहे.

-डॉ.आर.बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.

===Photopath===

150521\15bed_9_15052021_14.jpg~150521\15bed_8_15052021_14.jpg