शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे; परंतु आरोग्य विभागाकडून तिसरी लाट येण्याची ...

बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे; परंतु आरोग्य विभागाकडून तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे; पण ही लाट टाळण्यासाठी घातलेल्या निर्बंधांचे पालन करण्यासह मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची गरज आहे. तसेच कोरोना लसीकरण गतीने पूर्ण करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट त्रासदायक ठरल्यानंतर दुसरी लाट भयानक राहिली. कोनोबाधितांची संख्या वाढण्यासह मृत्यूदरही झपाट्याने वाढला होता. रोजची रुग्णसंख्या पाहता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागही चिंतेत होता; परंतु मागील आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. तसेच निर्बंधही शिथिल केले जात आहेत. असे असल्याने लोक पुन्हा एकदा बिनधास्त झाले आहेत. काही लोक तर काळजीच घेत नाहीत. अशाच चुका झाल्यास तिसरी लाट येणार हे अटळ आहे.

नगरपालिकेच्या ०६ पथकांची असेल नजर

बीड शहरात लॉकडाऊन असतानाही काही लोक बिनधास्तपणे बाहेर फिरतात. तसेच चोरून लपून, मागच्या दरवाजाने दुकाने चालू ठेवतात.

अशांची तपासणी करण्यासाठी बीड पालिकेकडून सहा पथकांची नियुक्ती केलेली आहे. प्रत्येकाला विभाग देण्यात आले असून, रोज आढावा घेतला जात आहे.

एका पथकात पालिकेचे स्वच्छता निरीक्षक व इतर कर्मचारी तसेच तहसीलचे कर्मचारी आणि संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

गत आठवड्यातच पालिकेचे स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव यांच्या पथकाने एका टेक्स्टाइल्सच्या दुकानाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

दररोज फिरून दुकाने आणि विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाया केल्या जात असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी सांगितले.

एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८७ हजार ३०७

एकूण कोरोनामुक्त ८१ हजार १२३

एकूण कोरोनाबळी २००९

उपचार सुरू असलेले ४ हजार १७५

--

केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनाने निर्बंधांचे पालन करून घ्यावे.

अत्यावश्यक अथवा महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू देऊ नये.

मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सच्या नियमांबाबत जागृत करावे.

शिथिल वेळ सोडता इतर वेळी लॉकडाऊनची अंमलबजावणी व्हावी.

आरोग्य विभागाने उपचार व सुविधांबाबत विश्वास निर्माण करावा.

===Photopath===

020621\02_2_bed_7_02062021_14.jpeg

===Caption===

बीड शहरातील भाजी मंडईत बुधवारी सकाळी शिथील वेळेत अशाप्रकारे गर्दी जमली होती.