शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या वर्षीही खरीप हंगामावर कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:34 IST

राजेश राजगुरू लोकमत न्यूज नेटवर्क तलवाडा : कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले आहे. असे असताना अवघ्या महिन्याभरावर आलेल्या ...

राजेश राजगुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

तलवाडा : कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले आहे. असे असताना अवघ्या महिन्याभरावर आलेल्या खरीप हंगामावर मागील वर्षीप्रमाणे संकट आहे. या चिंतेत शेतकरी सापडला आहे. सरकारला मात्र दुसऱ्या वर्षीही अनुदान, विमा, गारपिटीची भरपाई, कर्जमाफीचा विसर पडलेला दिसत आहे. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे.

गतवर्षीच्या मुबलक पावसामुळे पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली होती. यात टरबूज, खरबूज, काकडी, टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकांचा समावेश होता; पण गतवर्षीप्रमाणे याही वेळी ऐन पीक पदरात पडतांनाच कोरोनाच्या संचारबंदीमुळे लाख मोलाची पिके कवडीमोल दरात विकावी लागली. परिणामी खर्चही निघाला नसल्याने शेतकरी पुन्हा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने कापूस, तूर, सोयाबीनचे उत्पन्न घटले. इतर पिकांना लाखोंचा खर्च करून पदरात काहीच न पडल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. खरीप अवघ्या महिनाभरावर आला असताना बी-बियाणे कसे घ्यावे या विचारात असलेले शेतकरी मशागत करून पुन्हा निसर्गावर आशा ठेवून आपले भविष्य आजमावणार आहेत.

कोरोनात कर्जमाफी ही लांबली

कोरोनाने जगातील प्रत्येक घटकाचे नुकसान केले ; पण यात शेतकरी मात्र पुरता कोलमडल्याचे दिसत आहे. लाखांचे पीक रुपयात आले. कर्जमाफी होऊन नवीन कर्ज मिळेल ही अपेक्षाही लांबली. काही काम करावे, तर तेही जमत नसल्याने शेतकरी मशागतीला पैसे नसल्याने सावकाराच्या दारात उभा राहिला आहे.

.....

अनुदान, खरीप विमाही मिळेना

गेवराई तालुक्यातील काही गावांना गतवर्षीच्या अतिवृष्टीचे अनुदान अजून वाटप झालेले नाही, तर काही गावांना दुसऱ्या टप्प्याचे अनुदान येणे बाकी आहे. गतवर्षी अतिवृष्टीने पिके मातीमोल झाली. पण, विमा कंपनीकडून जाचक अटीमुळे अजूनही पदरात काहीच पडलेले नाही. त्यातच कर्जमाफीत उशिरा नाव आलेले अजून कर्जापासून वंचित आहेत.

गारपिटीमुळे ही नुकसान

गेल्या महिन्यात तालुक्यातील अनेक गावांत गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ती मदतही कोरोनात अडकली असल्याचे चित्र आहे. असे असताना यंदाही खरीप हंगामही कर्ज काढूनच करावा लागण्याचे चिन्हे आहेत.