शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने अन्नदानाचे स्थळ, लाभार्थीही बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : संपूर्ण जगाचे जीवनमान अस्थिर करून टाकलेल्या कोरोनाने शहरी व ग्रामीण भागातही बदल घडविले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : संपूर्ण जगाचे जीवनमान अस्थिर करून टाकलेल्या कोरोनाने शहरी व ग्रामीण भागातही बदल घडविले आहेत. गेल्या वर्षभरात हे बदल घरात बसूनच स्वीकारावे लागले. मंदिर, प्रार्थनास्थळांचे दरवाजे बंद झाले. एवढेच नव्हे, तर अन्नदानाचे स्थळ आणि लाभार्थीही बदलले. देवस्थानांच्या अन्नदानाला काही काळ स्थगिती मिळाली आहे.

भारत देश विविध परंपरेने, संस्कृतीने नटलेला आहे. शेकडोहून अधिक वर्षाच्याही परंपरा जशाच तशा सांभाळल्या जात होत्या. त्यात अन्नदानाला विशेष महत्त्व देत. दानात द्रव्यदान, भूदान, गोदान, सुवर्णदान, वस्त्रदान, कन्यादान असे दान महत्त्वपूर्ण मानले जात. असे असले, तरी आता नव्या दानात रक्तदान, नेत्रदान, किडनी दान, अवयवदान, देहदान, प्लाझ्मा दान अशा नव्या दानांची भर पडली.

रीतिरिवाज स्थगित ठेवले गेले. अन्नदानाला सर्वत्र मान्यता होती. लग्नात सगेसोयरे, मित्रपरिवार आप्तेष्ट यांच्यासह अगदी अख्खे गाव पंगतीत बसायचे. श्रीमंताचे लग्न असले, तर विचारूच नका. तालुका जिल्हा बाहेरून येणारे वऱ्हाडी भोजन पंक्तीत बसायचे. सप्ताह, जयंती, पुण्यतिथीसारख्या धार्मिक कार्यक्रमात तर लाखांवर महापंगती बसायच्या. तीर्थक्षेत्री अन्नदान होत होते. मात्र, आता हे सगळे थांबले असले, तरी अन्नदानाची परंपरा चालूच आहे. बदल झाला, तो ठिकाणांचा आणि लाभार्थ्यांचा.

जिल्हाभर शासनाच्या कोविड सेंटरशिवाय मोफत सेंटर सुरू झाले. त्यात शेकडो बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना नाश्ता, भोजन, दान देण्याची प्रथा सुरू झाली. या दानात सर्वधर्मीय माणूस म्हणून आधार देण्यासाठी अन्नदान यज्ञात आपली जमेल तेवढी समिधा टाकत आहे. कोरोनामुळे मंदिर, प्रार्थनास्थळावर सुरू असलेल्या अन्नदानाने कोरोना सेंटर गाठले. सगेसोयरे व भाविकांच्या जागी बाधित रुग्णांना अन्नदान केले जात असल्याचे चित्र आहे.

....

कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून मंदिरे बंद होती. यामुळे धार्मिक उत्सव बंद ठेवणे क्रमप्राप्त होते. निराधार, गरजू रुग्णांना या काळात आधार देण्याची खरी गरज आहे. ते काम अन्नदानाच्या माध्यमातून होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. अन्नदानाचे स्थळ बदलले असले, तरी त्यातून मिळणारे समाधान तेवढेच मोठे आहे.

- स्वामी विवेकानंद शास्त्री, महंत, सिद्धेश्वर देवस्थान, शिरुर.