शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा ! बीड जिल्ह्यात ७ व ९ मे रोजी बॅँका शिथिल वेळेत सुरु राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 16:45 IST

नागरिकांची अडचण होणार दूर

ठळक मुद्देविषम तारखेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश 

बीड : बुध्द पौर्णिमा आणि दुसरा शनिवार नेमके विषम तारखेस संचारबंदी शिथिल दिवशी असल्याने ७ व ९ मे रोजी जिल्ह्यातील सर्व बॅँका संचारबंदीच्या शिथिल कालावधीत चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी दुपारी जारी केले. 

केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार ७ मे रोजी बुध्द पौर्णिमा व ९ मे रोजी दुसरा शनिवारनिमित्त सुटी असल्याने दोन दिवस बॅँका बंद राहणार आहेत. दोन्ही विषम दिनांकास बॅँका बंद राहिल्याने नागरिकांना आर्थिक व्यवहार करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बॅँकांना हे निर्देश दिले आहेत. ७ व ९ मे रोजी बीड जिल्ह्यातील सर्व बॅँका संचारबंदीच्या शिथिल कालावधीत चालू ठेवाव्यात. तसेच सक्षम प्राधिकाऱ्याकडून पास घेतलेल्या संबंधित व्यक्तींना बॅँकेच्या सर्व सोई-सुविधा या तारखांना बॅँकेच्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात याव्यात. सुटीच्या कारणामुळे बाधा येऊ न देता या आधीच्या आदेशाप्रमाणेच बॅँकांचे कामकाज चालू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

लॉकडाऊनमुळे आर्थिक गरज असणाऱ्या ग्राहकांची बॅँकांमध्ये संचारबंदी शिथिल कालावधीत गर्दी होत आहे. महिन्याचा पहिला आठवडा असल्याने गरजपूर्तीसाठी लागणारी रक्कम काढण्यासाठी ही गर्दी होत आहे. घाटनांदूरमध्ये तर पहाटेपासूनच बॅँकेसमोर खातेदारांची रांग लागली होती. तसेच बुध्द पौर्णिमेनिमित्त बॅँक बंद राहतील यामुळे ५ मे रोजी संचारबंदी शिथिल कालावधीत जिल्ह्यातील बहुतांश बॅँकांमध्ये मोठी गर्दी पहायला मिळाली होती.  त्यामुळे नागरिकांची अडचण दूर व्हावी म्हणून ७ व ९ मे रोजी बॅँका चालू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडbankबँक