अस्वच्छतेचा त्रास
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात दर मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मोंढा परिसरात आठवडे बाजार भरतो. हा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने भाजीविक्रेते व विविध व्यापारी मोठ्या प्रमाणात इथे येतात. मात्र, बाजार संपल्यानंतर भाजी विक्रेते उरलेल्या भाज्या व कचरा इथेच टाकून जातात. त्यामुळे मोकाट जनावरांचा उपद्रव वाढून अस्वच्छता व दुर्गंधी निर्माण होत आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.
रेतीसाठ्यांकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात व परिसरात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करून मोठा साठा करून ठेवण्यात येतो. त्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यात येते. तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूसाठे असताना महसूल प्रशासनाच्या वतीने त्याकडे डोळेझाक करण्यात येत आहे.