बीड : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत बीड नगरपालिकेने जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धा घेतल्या होत्या. याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात निबंधमध्ये संस्कृती कवठेकर, चित्रकलेत अनुष्का कवडे, श्रद्धा वाघमारे, तर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्यात अंशदेव मिश्रा, क्षितिजा भूमकर हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. लवकर बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), स्वच्छ सर्वेक्षण २०२१, माझी वसुंधरा तसेच बीड नगर परिषद बीडअंतर्गत शहरांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी डिसेंबर २०२० मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यात चित्रकला, निबंध, लघुगीत, लघु चित्रफीत, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे आदींचा सहभाग होता. यासाठी विषयही ठरवून देण्यात आले होते. यात बीड शहरातील विद्यार्थी, नागरिक, तरुण, तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आता नुकताच याचा निकाल जाहीर झाला असून स्पर्धेतील विजेत्यांना लवकरच एका कार्यक्रमांत बक्षीस वितरण केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी दिली आहे. प्रथम विजेत्यास ३००१, द्वितीयला २००१, तर तृतीय विजेत्यास १००१ रुपये रोख, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाणार असल्याचेही डॉ. गुट्टे म्हणाले.
स्पर्धेतील विजेते
निबंध स्पर्धा - प्रथम संस्कृती कवठेकर, द्वितीय सानिका तांबारे, तृतीय क्षितिजा भूमकर
चित्रकला स्पर्धा - महाविद्यालय गटात प्रथम श्रद्धा वाघमारे, द्वितीय माधुरी मस्के, शालेय गटात प्रथम अनुष्का कवडे, द्वितीय आरोही गवते, तृतीय माधवी मोकाशे.
टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे - महाविद्यालय गटात प्रथम क्षीतिजा भूमकर, द्वितीय क्षमा भुमकर, शालेय गटात अंशदेव मिश्रा, द्वितीय हर्षरंजन जोगदंड.