माजलगाव शहरापासूनन ५ कि. मी. अंतरावर फुलेपिंपळगाव शिवारात नवीन मोंढा व टी.एम.सी.केंद्र असून या ठिकाणी शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते कल्याण गुंजकर आपल्या साथीदारासह बीडहून माजलगावकडे येताना त्यांना टी. एम. सी. केंद्राजवळ बिबट्या जात असल्याचे दिसून आले. त्यांनी आपली गाडी थांबवून त्याच्याकडे काहीवेळ पाहिले. थोड्या अंतरावर अंधारात बिबट्या गेला व त्यानंतर त्यांनी काही लोकांना बोलावून याची माहिती दिली. जमलेल्या नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो नंतर या ठिकाणी आढळून आला नाही. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. परिणामी रविवारी नवीन मोंढ्याच्या मालाच्या गाड्या भरण्यासाठी अनेक हमाल व मापाडी भीतीपोटी आले नसल्याचे आडत व्यापारी सांगत आहेत. या बाबत विचारणा करण्यासाठी येथील तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
नवीन मोंढ्यात बिबट्या दिसल्याने नागरिकांत भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:31 IST