शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मातृ-पितृछत्र हरवलेल्या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्हा टास्क फोर्सची बैठक, आतापर्यंत ३४८ पालकांची माहिती संकलित बीड : जिल्ह्यात कोरोनामुळे ३४८ बालकांचे मातृ-पितृछत्र ...

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्हा टास्क फोर्सची बैठक, आतापर्यंत ३४८ पालकांची माहिती संकलित

बीड : जिल्ह्यात कोरोनामुळे ३४८ बालकांचे मातृ-पितृछत्र हरवले आहे. यापैकी ३१४ मुलांचे पितृछत्र हरवले आहे. जिल्ह्यात कोविडमुळे मातृ-पितृछत्र हरवलेल्या ० ते १८ वयोगटातील बालकांना शासनाच्या बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी तसेच विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी तहसील पातळीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले.

कोविडमुळे आई, वडिलांचा मृत्यू झालेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दत्तात्रय गिरी, जि.प.चे बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रामेश्वर मुंडे, बालकल्याण समितीचे सुनील बळवंते, तत्त्वशील कांबळे, बालकामगार प्रकल्प संचालक ओमप्रकाश गिरी, बालसंरक्षण अधिकारी एस.एस. निर्मळ, चाइल्डलाइनचे समन्वयक रामहरी जाधव, जिल्हा परिविक्षा अधिकारी एन. एम. ताजनपुरे, बाजीराव ढाकणे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा विधी सेवा समिती सदस्य सचिवांचे प्रतिनिधी, सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. या बैठकीत कृती दलाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. बालसंरक्षण अधिकारी एस.एस. निर्मळ यांनी आतापर्यंत जिल्हाभरातून संकलित माहितीआधारे कोविड-१९ साथरोगामुळे एकपालक, द्विपालक, विधवा झालेल्या महिलांबाबतची आकडेवारी सादर केली.

------------------

बीड जिल्हा सद्यस्थिती

मयत झालेल्या पालकांची संख्या - ३४८ आई गमावलेल्या बालकांची संख्या - २७

वडील गमावलेल्या बालकांची संख्या - ३१४

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या - ७

विधवा महिलांची संख्या - ३१४

--------------

बालपणीच हरवले छत्र

जिल्ह्यात आतापर्यंत संकलित माहितीनुसार ० ते ६ वयोगटातील ७१ बालके, ६ ते १० वयोगटातील ९७ बालके, ११ ते १४ वयोगटातील ९८ बालके, १५ ते १८ वयोगटातील ८२ बालकांचे छत्र हरवलेले आहे.

------------

एकूण १९३ मुले आणि १५५ मुलींच्या नशिबी हे दु:ख आले आहे. यातील २७ बालकांची आई तर ३१४ बालकांचे वडील आणि ७ बालकांचे आईवडील कोरोनाने हिरावले आहेत.

------