शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोन मुख्याध्यापकांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:03 IST

बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी बीडमधील मिल्लिया प्राथमिक विद्यालयाच्या दोन मुख्याध्यापकांविरोधात बीडच्या प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे राजकीय वर्तूळासह बीड शहरात चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देवाद : बीड न.प.च्या नगरसेवकाचे बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी बीडमधील मिल्लिया प्राथमिक विद्यालयाच्या दोन मुख्याध्यापकांविरोधात बीडच्या प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे राजकीय वर्तूळासह बीड शहरात चर्चेला उधाण आले आहे. नगरसेवकाच्या बोगस प्रमाणपत्राबद्दल विरोधकांनी चांगलाच आवाज उठविल्याने हे प्रकरण गंभीर बनत आहे.शेख मुखीद लाला यांनी प्रभाग क्र.१६ मध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांचे जातीचे प्रमाणपत्र बोगस आहे, असा आक्षेप अशफाक इनामदार यांनी घेतला होता. यावर मुखीद लाला व त्यांचे चार भाऊ यांचे जुल्हा जातीच्या प्रमाणपत्राची संचिका न मिळाल्यामुळे मुखीद लाला व त्यांचे चार भाऊ यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विलास वरेकर, ई-सेतु चालक यांनी ५ जुलै २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. यावर पोलिसांनी तपास केला असता शाळेच्या मूळ रेकॉर्डमध्ये खाडाखोड केल्याचे समोर आले आहे. जात प्रमाणपत्र हे १८ आॅगस्ट २०१६ रोजीचे होते व शेख मुखीद यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जी संचिका दाखल केली त्या संचिकेमध्ये निर्गम उतारा, दाखला हे एक महिन्यानंतरचे असल्याचे दिसून आले.या सर्व प्रकरणाच्या तपासात मोहमद मुजाहेद हसमोद्दीन सिद्दीकी व शेख महम्मद अखिल या दोन्ही मुख्याध्यापकांनी सदर उताऱ्यावर चुकीची जातीची नोंद करुन दिली असल्याचे समोर आले. तसेच शेख अब्दुल मुखीद शेख रज्जाक, शेख जब्बार शेख रज्जाक, शेख गफार शेख रज्जाक, शेख ईलियास शेख रज्जाक, शेख सत्तार शेख रज्जाक यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.मुखीद लाला यांच्या भावाचे प्रमाणपत्र हस्तगतशेख मुखीद लाला यांचा एक भाऊ शेख ईलियास यांचे मुळ रेकॉर्डवर बागवान या जातीची नोंद असून त्यांनी देखील जुल्हा जातीचे प्रमाणपत्र हस्तगत केले आहे. त्यामुळे सदर मुळ रेकॉर्ड पोलीस ठाण्यात जमा आहे. दोन्ही मुख्याध्यापकांना हे प्रकरण महागात पडले असून सदर मुख्याध्यापकांनी सेवानिवृत्तीच्या अगोदरच स्वेच्छा निवृत्ती घेतली असून त्यांची पेन्शन देखील थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारण