शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्रीत तीन घरफोड्या, पोलिसांना आव्हान

By admin | Updated: July 17, 2017 18:31 IST

माजलगाव येथील सन्मित्र कॉलनी येथे आज पहाटे १ ते ४ वाजे दरम्यान चोरटयांनी चाकुचा धाक दाखवत तिन ठिकाणी घरफोडया केल्या.

ऑनलाईन लोकमत 

 
बीड/माजलगांव : माजलगाव येथील सन्मित्र कॉलनी येथे आज पहाटे १ ते ४ वाजे दरम्यान चोरटयांनी चाकुचा धाक दाखवत तिन ठिकाणी घरफोडया केल्या.  यात ५० हजाराचा ऐवज चोरीस गेला असून एकाच रात्रीत झालेल्या तीन फोड्या या पोलिसांना आव्हान ठरत आहेत. 
 
रविवारी शहरात पाऊस असल्याने सन्मित्र कॉलनीत नागरिकांची गस्त नव्हती. हीच संधी साधून चोरटयांनी प्रथम  पत्रकार पुरुषोत्तम करवा यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. दुस-या मजल्यावरील रुमच्या कडया लावुन गोडावुन मधील दहा हजाराच माल चोरी केला. दरम्यान करवा यांच्या मुलाला जाग आल्याचे पाहुन चोरांनी येथुन पोबारा केला.
 
यानंतर त्यांनी संजय देशमुख यांच्या घराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला मात्र त्या ठिकाणी चोरांना कांहीच हाती लागले नाही म्हणून त्यांनी समोरच असलेल्या दिनेश प्रभुणे यांच्या घरात पाठीमागील दरवाजाची कडी प्रवेश केला. यावेळी प्रभुणे यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांच्या पत्नीच्या गळयातील मंगळसुत्र व कानातील दीडतोळे दागिने, मोबाईल व नगदी चार हजार रुपये असा एकुण 40 हजारांचा मुददेमाला घेऊन ते पसार झाले. दरम्यान, करवा व प्रभुणे यांच्या फिर्यादीवरून पोलिसात अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल झाला असुन पी.एस.आय. तानाजी शिनगारे हे पुढील तपास करत आहेत. एकाच रात्रीत झालेल्या या धाडसी घराफोडीने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून हे एक प्रकारे पोलिसांना आव्हानच ठरले आहे.