शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीड शहर ‘ओडीएफ प्लस’ करण्याचे पालिकेसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:27 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये बीड शहर हागणदारीमुक्त करून स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. पालिकेने सर्व सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी बल्ब, पाण्याची टाकी, तोट्या, आरसे व इतर साहित्य बसवून ते सुविधायुक्त केले.

ठळक मुद्देसाहित्य चोरी : तपासणी समिती देणार अचानक भेट

बीड : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये बीड शहर हागणदारीमुक्त करून स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. पालिकेने सर्व सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी बल्ब, पाण्याची टाकी, तोट्या, आरसे व इतर साहित्य बसवून ते सुविधायुक्त केले. मात्र, यातील बहुतांश साहित्य चोरी गेले आहे. ‘ओडीएफ प्लस’ करण्यासाठी शौचालयांचे गुण सर्वात जास्त महत्वाचे आहेत. मात्र, साहित्य चोरी गेल्याने आता ‘ओडीएफ प्लस’ शहर कसे बनवायचे, असे आव्हान बीड पालिकेसमोर आहे.शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना आणि उपक्रम हाती घेतले जात आहेत. यातीलच एक स्वच्छ सर्वेक्षण आहे. यावर्षी शहरे हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे. यासाठी सर्वच नगर पालिका परिश्रम घेत आहेत. बीड पालिकाही मागे नाही.बीड शहरातील ३७ सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पाण्याच्या टाक्या, तोड्या, आरसे, भांडे व इतर साहित्य बसविले आहे. मात्र, रमाईनगर व इतर शौचालयांच्या ठिकाणचे साहित्यच चोरी गेल्याचे पाहणीतुन समोर आले आहे. प्रकाशासाठी बसविलेले बल्ब तर काही तासांतच चोरी गेल्याचे समोर आले आहे. एकीकडे सुविधा दिल्या जात असताना दुसऱ्या बाजुला असे चोरीचे प्रकार घडत असल्याने शहर ‘ओडिएफ प्लस’ कसे करायचे? असे आव्हान पालिकेसमोर असणार आहे.आष्टी, गेवराईला अचानक भेटीपालिकांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीहून ‘क्यूसीआय’ (क्वालिटी कंट्रोल इनस्पेक्शन) समिती येणार आहे. यापुर्वी या समितीने अचानक आष्टी आणि गेवराई पालिकेची भेट देऊन तपासणीही केली आहे. बीड पालिकेचीही अचानक कधीही तपासणी होऊ शकते. सार्वजनिक शौचालयांनाच सार्वाधीक गुण आहेत. मात्र, साहित्य चोरी गेल्याने आता बीड पालिकेला ही समिती किती गुण देणार आणि समितीसमोर बीड पालिका हा सर्व प्रकार कसा मांडणार, हे वेळच ठरविणार आहे.

टॅग्स :BeedबीडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान