शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाळिशीनंतर वाहन परवान्यासाठी द्यावे लागते फिट असल्याचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST

अविनाश मुडेगावकर/ लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक असे एकही साहित्य नाही. ना डोळ्यांची तपासणी, ना कानाची ...

अविनाश मुडेगावकर/

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक असे एकही साहित्य नाही. ना डोळ्यांची तपासणी, ना कानाची तपासणी. तरीही चालक वैद्यकीयदृष्ट्या फिट असल्याचे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात झेरॉक्स सेंटरवर मिळते. रस्त्यावर धावणाऱ्या लाखो लोकांचा जीव हाती असणारा चालक सक्षम असल्याचा दाखला देण्याची ही पद्धत धोकादायक ठरणारी आहे.

वयाची चाळिशी गाठलेल्यांना वाहन परवाना काढण्यासाठी चालक हा शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा. असा नियम आहे. हे सिद्ध करण्यासाठी ‘एमबीबीएस’ डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते. आरटीओ कार्यालयाच्या परिसरात बसून असे प्रमाणपत्र देणारे अनेक डॉक्टर आहेत. केवळ १०० रुपये देऊन अर्जदाराचा फोटो चिटकवून कुठलीही समस्या नसल्याचे स्वाक्षरी व शिक्का मारून प्रमाणपत्र दिले जात आहे. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार बिनबोभाट सुरू आहे. कार्यालयापेक्षा कार्यालया बाहेरच अनेक कामे बिनबोभाट होतात. जर कार्यालयात कामासाठी गेलेच तर हेलपाटे मारण्याची वेळच येते. मात्र, हेच काम दलालामार्फत अगदी कांही वेळातच होते. अशीच जणूकाही कामाची पद्धत बनली आहे.

.....

ना कानांची, ना डोळ्यांची तपासणी

आरटीओ कार्यालयाच्या परिसरातील झेरॉक्स सेंटरवर बसून वैद्यकीय प्रमाणपत्र देणारे हे डॉक्टर खरोखरच डॉक्टर आहेत का? हा प्रश्न आहे. ते ना कानांची, ना डोळ्यांची तपासणी करतात. पैसे दिल्यास ते कोणालाही प्रमाणपत्र देत असल्याचे वास्तव आहे.

...

‘एमबीबीएस’ डॉक्टरांचेच प्रमाणपत्र

पूर्वी आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी डॉक्टरही हे प्रमाणपत्र द्यायचे. परंतु यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर केवळ ‘एमबीबीएस’ असलेल्या डॉक्टरांचेच प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते. एका डॉक्टरला दिवसांतून जास्तीत २० प्रमाणपत्रे देता येतात.

...

....यांना द्यावे लागते वैद्यकीय प्रमाणपत्र

वयाची चाळिशी ओलांडलेल्या प्रत्येक अर्जदाराला वाहन परवाना काढण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागते. याशिवाय, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना किंवा वाहन परवान्याच्या नूतनीकरणासाठी हे प्रमाणपत्र जोडावे लागते. विशेष म्हणजे, वयाच्या पन्नाशीनंतर दर पाच वर्षांनी वाहन परवान्याचे नूतनीकरण करताना वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागते.

....

वयाची चाळिशी गाठलेल्यांना नव्या वाहन परवान्यासाठी किंवा परवान्याच्या नूतनीकरणासाठी किंवा आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यासाठी एमबीबीएस असलेल्या डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र गरजेचे असते. त्याशिवाय ती प्रक्रिया पूर्ण होत नाही.

-दत्तात्रय सांगोलकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अंबाजोगाई.

.....

वितरित झालेले वाहन परवाने

सन-२०१९-२०

लर्निंग-३७९०४

पर्मनंट-११६००

सन-२०००-२०२१

लर्निंग-३२७९३

पर्मनंट-१०१४१

सन-२०२१

लर्निंग-१८०६

पर्मनंट-९८९