शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बीड झेडपीच्या शिक्षण विभागात सीईओंकडून ‘सफाई मोहीम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:37 IST

बीड येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मागील पाच वर्षांपासून तुंबलेली अनागोंदी आणि त्याचे होणारे दुष्परिणाम दृष्टीपथात येताच मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी या विभागात सफाई मोहीम जोमाने सुरु केली आहे. एकीकडे कक्ष अधिकारी जयलाल राजपूत यांची उचलबांगडी करतानाच तपासणी मोहिमेतून जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांतील बोगसगिरीवर घाव घातला.

ठळक मुद्देकक्ष अधिकाऱ्याची बदली; वसतिगृहांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मागील पाच वर्षांपासून तुंबलेली अनागोंदी आणि त्याचे होणारे दुष्परिणाम दृष्टीपथात येताच मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी या विभागात सफाई मोहीम जोमाने सुरु केली आहे. एकीकडे कक्ष अधिकारी जयलाल राजपूत यांची उचलबांगडी करतानाच तपासणी मोहिमेतून जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांतील बोगसगिरीवर घाव घातला.

जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांच्या तुलनेत तेथील महत्वाच्या टेबलवर काम करणारे अधिकारी, कर्मचारीच कारभार चालवितात, असे नेहमी बोलले जात होते. वर्षानुवर्षे टेबल सांभाळणाºया या अधिकाºयांनी शासन नियम धाब्यावर बसविण्याचे तसेच शासनाचे हित लक्षात न घेता स्वत:च्या तुुंबड्या भरण्याचेच काम केले. मस्तावलेल्या या अधिका-यांकडून कामाचा अतिरेक झाल्यानंतर तक्रारी वाढल्या. अनेकदा तक्रारींनाही कचºयाची कुंडी मिळाली. परंतू महिनाभरापुर्वी रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मात्र येणा-या तक्रारींची गुप्तपणे खातरजमा केली.

त्यानंतर कक्ष अधिकारी जयलाल राजपूत यांना तडकाफडकी माजलगाव येथे रुजू होण्याबाबत आदेशित केले. शिक्षण विभागातील ‘मास्टर माइंड’ हलविल्याने मोठा ब्लॉक बाहेर निघाल्याच्या प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी व्यक्त केल्या.अधिनियमांना फाटा देत नियमबाह्य नियुक्त्याजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कक्ष अधिकारी नियुक्त करताना ती व्यक्ती जि. प. अधिनियमांनुसार पात्र आहे का? याची शहानिशा न करता केवळ माहिती असल्याने शिरुर येथून थेट बीडमध्ये नियुक्ती कोणी केली, का केली इतके दिवस त्याकडे दुर्लक्ष का झाले? असे अनेक प्रश्न आहेत.

लवकरच सुरु होणार चौकशीप्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षतेमुळे शिक्षण विभाग हायजॅक करु पाहणाºया या अधिकाºयाची लवकरच चौकशी सुरु होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सतरा जणांवर कारवाईची शक्यताबेकायदेशीरपणे नियुक्त केलेले सात विस्तार अधिकारी, चार केंद्रप्रमुख, सहा मुख्याध्यापक यांच्यावरही लवकरच कारवाई होणार असल्याचे समजते.

नियुक्त्यांमध्ये ‘अर्थपूर्ण’ व्यवहारावर भरवस्तीशाळा तसेच सात विस्तार अधिकाºयांच्या नियमबाह्यपणे नियुक्त्यांचा विषय चर्चेत होता. हा प्रश्न सुलभतेने सुटण्यासाठी प्रशासन पातळीवर कार्यवाही तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार कामकाज अपेक्षित असताना उलट हा प्रश्न रेंगाळत राहिला. मिळालेल्या माहितीनुसार चार केंद्र प्रमुख व सहा मुख्याध्यापकांच्या नियुक्त्याही नियमबाह्य होत्या. सेवाज्येष्ठता डावलून या नियुक्त्या करताना संस्थेचे हित न पाहता ‘अर्थपूर्ण’ व्यवहारावरच भर राहिल्याचे उघड होत आहे.

कागदी मेळातून उखळ पांढरेतत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जवळेकर, शिक्षणाधिकारी देवगुडे यांच्या कार्यकालात शिक्षण विभाग मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरले. आंतरजिल्हा बदल्या, अतिरक्ति शिक्षकांचे गरजेपेक्षा जास्त आदेश आदी प्रश्न निर्माण झाले. याला खतपाणी घालण्याचे काम या विभागातूनच झाले आहे. जि.प.तील भ्रष्टाचाराचे कुरण हा विभाग बनला होता. वेळप्रसंगी लोकप्रतिनिधींनाही न जुमानता, कागदी मेळ बसवून अनेक प्रश्न क्लिष्ट कसे करता येईल व यातून उखळ पांढरे करायचे यावरच या विभागाचा भर राहिला आहे.