शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

कोरोनासाठी ११३८ खाटांची क्षमता, २९४ खाटांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:51 IST

बीड : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहून नव्याने कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार असल्याची ...

बीड : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे पाहून नव्याने कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार असल्याची चर्चा होती. परंतु, सध्यातरी नवे सेंटर उघडण्याची गरज नाही. जिल्ह्यात काेरोनासाठी ११३८ खाटांची क्षमता असून केवळ २९४ खाटांवर रुग्ण आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून सोमवारी देण्यात आली.

जिल्ह्यात गतवर्षी जुलै महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे प्रशासनाने लक्षणे नसणाऱ्यांना विलगीकरण करता यावे, यासाठी कोविड केअर सेंटर सुरू केले होते. बीडमध्येही प्रत्येक तालुक्यात हे सेंटर उघडून तेथे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कक्षसेवक अशी पदे भरली होती. काही महिने या सेंटरमध्येही खूप गर्दी झाली होती. परंतु, डिसेंबर महिन्यात रुग्णसंख्या कमी झाल्याने पुन्हा हे सेंटर बंद करून ५० कर्मचारी कपात करण्यात आले. परंतु, आता मागील आठवड्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. असे असले तरी बीडमध्ये आणखी तेवढी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे नवे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा विचार आताच नसल्याचे सांगण्यात आले.

बीडमध्ये एकमेव सेंटर सुरू

जिल्ह्यात सुरू असलेले सर्व कोविड केअर सेंटर बंद करण्यात आलेले आहेत. सध्या बीडमधील शासकीय आयटीआयमध्ये एकमेव कोविड केअर सेंटर सुरू आहे. येथे १५० खाटांची क्षमता असून सोमवारी केवळ ४ रुग्ण भरती होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका व इतर स्टाफ कार्यान्वित आहे.

कोट

सध्या जिल्ह्यात खाटा रिक्त आहेत. नवे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत वरिष्ठांशी बाेलून निर्णय घेण्यात येईल. आतापर्यंत तरी तसा विचार नाही. रुग्णसंख्या वाढल्यावर पुढील कारवाई केली जाईल.

डॉ.आर.बी.पवार

जिल्हा आरोग्य अधिकारी बीड

---

एकूण रुग्ण - १८४५५

एकूण कोरोनामुक्त - १७५७१

एकूण मृत्यू - ५७३

----

अशा आहेत खाटा रिक्त

रुग्णालय खाटांची क्षमतामंजूर खाटारुग्ण

सीसीसी बीड १५० ५० ४

ट्रॉमा केअर, आष्टी ५० ३० १८

जिल्हा रुग्णालय, बीड ३०० १५० ९३

स्वाराती, अंबाजोगाई ३०० १०० १३०

लोखंडी सावरगाव २५० ३० ३८

खाजगी रुग्णालये ८८ ८८ १२

एकूण ११३८ ४४८ २९४