शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन रद्द करा; एआयएमआयएम आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

गेल्या वर्षभरापासून सर्व उद्योग, व्यवसाय तोट्यामध्ये असून, व्यावसायिक, शेतकरी, कष्टकरी, कामगार व सामान्य नागरिक निराशेच्या खाईत लोटले गेले आहेत. ...

गेल्या वर्षभरापासून सर्व उद्योग, व्यवसाय तोट्यामध्ये असून, व्यावसायिक, शेतकरी, कष्टकरी, कामगार व सामान्य नागरिक निराशेच्या खाईत लोटले गेले आहेत. मागील वर्षभर थकलेले जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार व लाइट बिल भरण्यासाठी व्यावसायिकांवर आईच्या, पत्नीच्या अंगावरील सोने गहाण ठेवण्याची किंवा विकून टाकण्याची नामुष्की आली आहे. हे सर्व असताना त्यातच जिल्हा प्रशासनाने पुन्हा १५ जूनपर्यंत लॉकडाऊनचा आदेश दिला आहे. यामुळे सर्व छोटे-मोठे व्यावसायिक, रोजंदारीवर काम करून पोट भरणारे, कामगार, शेतकरी, कष्टकरी, श्रमिक यांचे हाल झाले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

लाॅकडाऊनच्या काळात सील केलेली दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, सर्व दुकाने उघडावीत, सरसकट कोरोना लस देण्यात यावी, नियम कडक करून नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अत्यावश्यक वस्तू दुकाने, किराणा, बेकरी, मांस, मटन आदी, तसेच हॉटेलला पार्सल सुविधेची परवानगी देण्यात यावी, आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत. निवेदनावर जिल्हाध्यक्ष शेख शफिक यांच्यासह एजाज खन्ना, नगरसेवक शेख मतीन, नगरसेवक हाफीज अशपाक, मुफ्ती वाजेद, नईम मेंबर, सोफियान मनियार, इलियास इनामदार, नसीर, रियाज खान आदींची नावे व सह्या आहेत.