केज शहरातील फुलेनगर भागात पत्त्यांचा जुगार राजरोसपणे रिकाम्या जागेत खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभवन यांना मिळाली होती. त्यावरून जमादार बाळकृष्ण मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा मारला असता, सुरेश जाधव याच्या घरासमोर रिकाम्या जागेत भीमा लक्ष्मण ठोंबरे, नवनाथ संभाजी धिवार, भानदास पंढरीनाथ गायकवाड, उद्धव रंगनाथ गायकवाड, सुरेश यशवंत जाधव, नदीम शेख हे विनापरवाना व बेकायदेशीरपणे स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडून नगदी १३ हजार ८५० रुपये व पाच मोबाइल असा ३० हजार ५५० रुपयांचा माल जप्त केला. जमादार बाळकृष्ण मुंडे यांच्या फिर्यादीवरून भीमा ठोंबरे, नवनाथ धिवार, भानदास गायकवाड, उद्धव गायकवाड, सुरेश जाधव, नदीम शेख या सहा जणांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
केजमध्ये झन्ना-मन्ना खेळणारे ६ जुगारी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:04 IST