शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात व्यापार्‍यांकडून कवडीमोल भावाने तूर खरेदी; शेतकरी शासकिय खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 19:46 IST

बाजारात मोठ्याप्रमाणावर तूर विक्रीसाठी आलेली असतांना सुध्दा शासकिय धान्य खरेदी केंद्र सुरु झालेली नाहीत. यामुळे नाईलाजाने शेतकर्‍यांना खाजगी व्यापार्‍यांना हमीभावा पेक्षा 900 रूपये प्रतिक्विंटल कमी भावाने तूर विक्री करावी लागत आहे.

माजलगाव,( बीड ) : बाजारात मोठ्याप्रमाणावर तूर विक्रीसाठी आलेली असतांना सुध्दा शासकिय धान्य खरेदी केंद्र सुरु झालेली नाहीत. यामुळे नाईलाजाने शेतकर्‍यांना खाजगी व्यापार्‍यांना हमीभावा पेक्षा 900 रूपये प्रतिक्विंटल कमी भावाने तूर विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतकरी व खरेदी विक्री संघाने शासकीय खरेदी केंद्र सुरुकरण्याची मागणी केली आहे.

या वर्षी तालुक्यात  मोठ्या प्रमाणात तुर पिकाची लागवड झालेली आहे. हे तुर पिकाची काढणी मागील आठ दिवसापासून सुरू झाली आहे. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या हमीभाव खाजगी बाजारपेठेत मिळत नाही. हमीभाव 5 हजार 450 रूपये असतांना खाजगी व्यापार्‍यांकडून केवळ 4600 रूपये प्रतिक्विंटल प्रमाणेच भाव मिळत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत असून शासनाने तात्काळ शासकिय खरेदी केंद्र सुरू करून शेतकर्‍यांच्या तुरीला हमीभाव देवून व्यापार्‍यांकडून होत असलेल्या आर्थिक लुट थांबवावी अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. 

खरेदी विक्री संघाची मागणी

यासोबतच शेतक-यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी तत्काळ शासकीय खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन दिपक जाधव यांनी बीड जिल्हा मार्केटींग अधिकारी यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Beedबीड