शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वंचित घटकातील मुलांना समाजकल्याण आणणार शिक्षणाचा प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात मजुरी, भंगार वेचणारे, भीक मागणाऱ्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या सर्वांना शिक्षणाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात मजुरी, भंगार वेचणारे, भीक मागणाऱ्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजकल्याण विभागाने ‘थेट प्रवेश प्रक्रिया’ अभियान राबविले आहे. वाड्या-वस्त्या, गावांत जाऊन सर्वेक्षण करून त्यांचे शाळेत प्रवेश घेतले जात आहेत. जिल्ह्यातील विविध वसतिगृहे, आश्रमशाळांमध्ये तब्बल ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. यामुळे दिलासा मिळाला आहे.

बीडची ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. तसेच मजुरी, रस्त्याच्या कडेला पाल ठोकून राहणारे, वीटभट्टी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या मुलांना शिक्षण दिले जात नाही. हाच धागा पकडून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी या सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष अभियान राबविले आहे. १८ जून ते १५ जुलैदरम्यान शिक्षक, कर्मचारी घरोघरी जाऊन या मुलांचे प्रवेश घेणार आहेत. यामध्ये व्हीजेएनटी समाजासाठी असलेल्या ४६ आश्रमशाळा आणि अनुसूचित जातीच्या मुले-मुलींसाठी असलेल्या ३ निवासी शाळा, १३ शासकीय वसतिगृहे, १५ निवासी अनुसूचित जातीच्या आश्रमशाळा एवढ्या वसतिगृहांत जिल्ह्यातील ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. प्रवेशासाठी कसलेही शुल्क लागणार नसून, पहिले ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. तसेच राहणे, जेवण, पुस्तके, गणवेश सर्व साहित्य मोफत मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

---

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ‘मिशन डायरेक्ट ॲडमिशन’ हा प्रयोग राबविला जात आहे. वंचित घटकातील मुलांचा शोध घेऊन त्यांचे घरी जाऊन शाळेत प्रवेश घेतले जातील. शिक्षणासह सर्व शालेय साहित्य मोफत दिले जाणार आहे. याबाबत सर्वांना सूचना केल्या आहेत. १८ जून ते १५ जुलैदरम्यान सर्वेक्षण करून प्रवेश घेतले जात आहेत.

डॉ. सचिन मडावी, सहायक आयुक्त, बीड

--

अशी आहे आकडेवारी

जिल्ह्यात ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी ६ मुलांची व ६ मुलींची अशी १२ वसतिगृहे,

व्हीजेएनटी समाजासाठीच्या ४६ आश्रमशाळा

अनुसूचित जातीच्या १३ शासकीय वसतिगृहे, ३ शासकीय निवासी शाळा

७४ अनुदानित वसतिगृहे आणि १५ अनुदानित आश्रमशाळा येथे मोफत प्रवेश करून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

===Photopath===

190621\19_2_bed_14_19062021_14.jpeg~190621\19_2_bed_13_19062021_14.jpeg

===Caption===

डॉ.सचिन मडावी~पालावर जावून विद्यार्थ्यांचे प्रवेश घेताना समाकल्याणेच कर्मचारी दिसत आहेत.