शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वीट उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:23 IST

------------- वाढीव वीजदर कमी करण्याची मागणी अंबाजोगाई : कोरोनाच्या संक्रमण काळात महावितरणच्या वतीने छुप्या पद्धतीने वीज दर ...

-------------

वाढीव वीजदर कमी करण्याची मागणी

अंबाजोगाई : कोरोनाच्या संक्रमण काळात महावितरणच्या वतीने छुप्या पद्धतीने वीज दर वाढविण्यात आले आहेत. वीज बिलांच्या रकमा मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. शासनाने कोरोनाच्या काळात वीज बिल तर माफ केलेच नाही उलट वाढीव दर ठरवून वीज आकारणी सुरू केली आहे. वाढते वीज बिल ग्राहकांना परवडणारे नाही. यासाठी रीडिंगप्रमाणे बिल देऊन इतर अधिभार रद्द करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कऱ्हाडे यांनी केली आहे.

----------

कोरोनामुळे व्यापाऱ्यांना फटका

अंबाजोगाई : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. तरीही प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची मुभा दिली आहे. असे असले तरी शहरातील व्यापाऱ्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात मंदावले आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरविल्याने व्यापारी संकटात सापडले आहेत.

-----------

बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामीण जनता त्रस्त

अंबाजोगाई : लॉकडाऊन उघडल्यानंतरही ग्रामीण भागातील बस सेवा अजूनही सुरू झालेली नाही. लॉकडाऊनच्या काळात बस वाहतूक सेवा पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात रुग्णालयात येण्यासाठी वाहनांची सुविधा उपलब्ध करावी. इतर वाहनांनाही बंदी करण्यात आल्याने व बसफेऱ्या बंद असल्याने रुग्णालयापर्यंत जायचे कसे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे. बसफेऱ्या बंद झाल्याचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसू लागला आहे.

------------

प्रोत्साहन रक्कम कधी होणार जमा

अंबाजोगाई : राज्य शासनाने नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. एक वर्ष लोटून गेल्यानंतही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. ती तातडीने जमा करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कुलकर्णी यांनी केली आहे.

---------