शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वीट उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:23 IST

वाढीव वीजदर कमी करण्याची मागणी अंबाजोगाई : कोरोनाच्या संक्रमणकाळात महावितरणच्या वतीने छुप्या पद्धतीने वीजदर वाढविण्यात आले आहेत. वीजबिलांच्या ...

वाढीव वीजदर कमी करण्याची मागणी

अंबाजोगाई : कोरोनाच्या संक्रमणकाळात महावितरणच्या वतीने छुप्या पद्धतीने वीजदर वाढविण्यात आले आहेत. वीजबिलांच्या रकमा मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. शासनाने कोरोनाच्या काळात वीजबिल तर माफ केलेच नाही. उलट वाढीव दर ठरवून वीज आकारणी सुरू केली आहे. वाढते वीजबिल ग्राहकांना परवडणारे नाही. यासाठी रीडिंगप्रमाणे बिल देऊन इतर अधिभार रद्द करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कऱ्हाडे यांनी केली आहे.

कोरोनामुळे व्यापाऱ्यांना फटका

अंबाजोगाई : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे, तरीही प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची मुभा दिली असली तरी शहरातील व्यापाऱ्यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात मंदावले आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याने व्यापारी संकटात सापडले आहेत.

बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामीण जनता हैराण

अंबाजोगाई : लॉकडाऊन झाल्यानंतरही ग्रामीण भागातील बससेवा अजूनही सुरू झालेली नाही. लॉकडाऊनच्या काळात बसवाहतूक सेवा पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात रुग्णालयात येण्यासाठी वाहनांची सुविधा उपलब्ध करून द्यावी. इतर वाहनांनाही बंदी करण्यात आल्याने व बसफेऱ्या बंद असल्याने रुग्णालयापर्यंत जायचे कसे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे. बसफेऱ्या बंद झाल्याचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसू लागला आहे.

प्रोत्साहन रक्कम कधी जमा होणार?

अंबाजोागाई : राज्य शासनाने नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. एक वर्ष लोटून गेल्यानंतरही अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. ती तातडीने दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कुलकर्णी यांनी केली आहे.