शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेणाऱ्या पुरवठा निरीक्षकाला रंगेहात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST

बीड : नियमाप्रमाणे माल पुरवण्यासाठी रेशन दुकानदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक रवींद्र सुभाष ...

बीड : नियमाप्रमाणे माल पुरवण्यासाठी रेशन दुकानदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक रवींद्र सुभाष ठाणगे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडले.

रवींद्र ठाणगे बीड तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत होता. १० जूनला रेशन दुकानदाराला नियमाप्रमाणे मालपुरवठ्यासाठी त्याने दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार रेशन दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी केली असता रवींद्र ठाणगे याने दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे मान्य केले व १५ जूनला ही रक्कम देण्या-घेण्याचे ठरले. १५ जूनला तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. पुरवठा विभागाच्या कार्यालयात दहा हजारांची लाच स्वीकारताना पुरवठा निरीक्षक रवींद्र ठाणगे यास रंगेहात पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बीड येथील पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी, अंमलदार अमोल बागलाने, हनुमंत गोरे, मोरे यांनी हा सापळा यशस्वी केला. रवींद्र ठाणगे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ७, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.