शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेथ ॲनालायझर धूळखात, वाहन चालवतात तळीराम झोकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:32 IST

बीड : मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वानचालकाने दारू पिलेली आहे का याची ...

बीड : मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वानचालकाने दारू पिलेली आहे का याची तपासणी करण्यासाठी ब्रेथ ॲनालायझरचा वापर केला जातो. मात्र, कोरोना संसर्गामुळे ब्रेथ ॲनालायझर धूळखात पडले असून, तळीराम सर्रास वाहन चालविताना मिळून येतात. त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर असते, मागील वर्षभरात ३०३ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

मद्य प्राशन करून वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या धुळे-सोलापूर व विशाखापट्टणम-कल्याण या महामार्गावर सर्वाधिक आहे. या अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वर सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळावेत, असे आवाहन वाहतूक विभाग व महामार्ग पोलिसांकडून नागरिकांना वेळोवेळी केले जाते. कोरोना संसर्गामुळे वाहनचालकांनी दारू पिली आहे का याची तपासणी बंद आहे. मात्र, संशय आल्यानंतर पोलिसांकडून संबंधित चालकांचे रुग्णालयातून तपासणी करून ड्रक ॲन्ड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहेत.

आश्चर्य ! मेमध्ये कोणीच ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह केले नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चअखेरीस लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात मद्यविक्रीवर निर्बंध होते. लॉकडाऊनमुळे बाहेर फिरणे बंद होते. त्यामुळे मेमध्ये ड्रंक ॲन्ड ड्राईव्हप्रकरणी एकही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतरदेखील डिसेंबरपर्यंत मागच्या वर्षीच्या तुलनेत कारवाया कमी झालेल्या आहेत.

चोरट्या पद्धतीने दारूविक्री

कोरोनाकाळात दारू विक्रीवर निर्बंध होते. त्या काळात चोरट्या पद्धतीने अनेक हॉटेल व वाईन शॉपवरून दारू विक्री चढ्या दराने केली जात होती. याकाळात दारूविक्री करणाऱ्यांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर, चोरट्या पद्धतीने दारूविक्री करून लॉकडाऊननंतर दारूबंदी विभागास माहिती द्यावी लागेल, या भीतीने अनेकांनी दारू चोरीला गेल्याची फिर्याद देत गुन्हे दाखल केले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्राद्वारे तपासणी बंद आहे. मात्र, संशयित आढळल्यास त्या वाहनचालकाची रुग्णालयातून तपासणी करून कारवाई केली जात आहे.

कैलास भारती वाहतूक शाखाप्रमुख बीड

ड्रक ॲन्ड ड्राईव्ह कारवाई

महिना २०१९ २०२०

जानेवारी ५८ ८१

फेब्रुवारी १८ ३९

मार्च १२० ९७

एप्रिल ९ १

मे ७ ०

जून ५४ ४

जुलै ६३ १

ऑगस्ट १३ ३

सप्टेंबर १५ ३

ऑक्टोबर ६ ५

नोव्हेंबर ८३ २९

डिसेंबर ९९ ४०