शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाराती’मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान करणारी चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:19 IST

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागात स्तनाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी सुरु झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागात स्तनाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी सुरु झाली आहे. मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापैकी फक्त अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातच या तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. या तपासणीचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्ष-किरण विभागात महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी आवश्यक असलेली अत्यंत आत्याधुनिक सुविधा असलेली थ्री डी मॅमोग्राफी तपासणीची सुविधा १५ जूनपासून सुरु करण्यात आली आहे.स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात बसवण्यात आलेली ही मॅमोग्राफी मशीन १ कोटी ५० लाख रुपये किंमतीची असून स्तनाच्या कॅन्सरचे अचूक निदान करणारी मशीन आहे. या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या आवश्यक त्या सर्व रुग्णांच्या योग्य निदानासाठी या तपासणी सुविधेचा लाभ रुग्णांना मिळवून द्यावा व अचूक निदान करुन योग्य तो वैद्यकीय उपचार करावा अशा सूचना अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.महाविद्यालयाच्या क्ष-किरण विभागात झालेल्या या कार्यक्रमास वैद्यकीय महाविद्यालयातील क्ष-किरण, मेडिसिन, सर्जरी, ओबीसीटी, गायनिक आणि इतर विभागाचे प्रमुख, पदव्युत्तर विद्दार्थी तसेच वैद्यकीय महाविद्यालय समितीचे सदस्य डॉ.पी.एस. पवार वैद्यकीय महाविद्यालय रॅगिंग प्रतिबंधक समितीचे सदस्य सुदर्शन रापतवार, सुरक्षा समितीचे सदस्य रमाकांत पाटील, मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, सर्जरी विभाग प्रमुख डॉ. नितीन चाटे, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.राकेश जाधव, अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. दीपक लामतुरे, मेट्रन उषा भताने, क्ष-किरण विभाग प्रमुख डॉ. सर्वेश पाटील, राहुल बुजाडे, डॉ. प्रतीक गायकवाड, डॉ. शालिनी, डॉ. प्रतीक उमरीकर, गायनिक विभागाचे डॉ.गणेश तोंडगे, मेडिसीन चे डॉ.उदय जोशी, क्ष-किरण विभागातील कर्मचारी परिचारिका व इतर अनेक मान्यवर उपस्थितहोते.

टॅग्स :cancerकर्करोगhospitalहॉस्पिटलtechnologyतंत्रज्ञान