शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियम तोडणे अंगलट, लायसन्स होऊ शकते रद्द !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:39 IST

बीड : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने दंड तर भरावाच लागतो, शिवाय वाहन चालविण्याचा परवाना देखील निलंबित होऊ शकतो. आठ ...

बीड : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने दंड तर भरावाच लागतो, शिवाय वाहन चालविण्याचा परवाना देखील निलंबित होऊ शकतो. आठ महिन्यांत ३३२ जणांवर लायसन्स निलंबनाचा प्रस्ताव वाहतूक शाखेमार्फत संबंधित उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पाठविल्याचे समोर आले आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 'ब्रेक' लावण्यासाठी पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. सोबतच पोलीस उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची शिफारस करू शकतात. यातून बेशिस्त वाहनचालकांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न असतो.

आकडे बोलतात...

वर्ष लायसन्स निलंबन

२०२० २२५

२०२१ ३३२

....

अशी होते कारवाई...

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संबंधित वाहनचालकाकडून दंड वसूल करतात. त्यानंतर त्याचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यासाठी त्याच्या जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देतात. त्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होते.

....

आधी तीन महिने, नंतर कायमस्वरूपी

बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी सुरुवातीला तीन महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबित केला जातो. त्यानंतर वारंवार चालक नियमांचा भंग करून निर्ढावलेपणा करत असल्यास, कायमस्वरूपी परवाना निलंबित केला जाऊ शकतो.

...

वाहतूक नियमांचे पालन करणे ही वाहनचालकांची जबाबदारी आहे. स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठीही ते आवश्यक आहे. दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबनाची यात तरतूद आहे. वाहनचालकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असेल, तर कायमस्वरूपी परवाना निलंबित केला जाऊ शकतो. नियम पाळून सर्वांनी सहकार्य करावे.

- भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, बीड

...

हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन...

- दुचाकी, चारचाकी वाहने चालविताना मोबाईलवर बोलणे गैर आहे.

- मादक द्रव्याचे सेवन करून किंवा नशा करून वाहने चालविल्यावरही परवाना निलंबित होऊ शकतो.

- सिग्नल तोडल्यास देखील अशी कारवाई होऊ शकते.

- अति वेगाने वाहन चालविल्यावर देखील परवाना निलंबन होते.

....