शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविण्यात विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:33 IST

बीड - जामखेड - नगर राज्य महामार्गावर अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अरुंद रस्ते झाल्याने अपघात वाढले आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत अशी मागणी झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने नावाला चार वेळा मोजणी केली. अतिक्रमण हटविण्याचा हा बार फुसका गेल्याने ती काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त मिळेल का ? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देबीड- नगर राज्यमहामार्ग : चार वेळा मोजणी करूनही बांधकाम विभागाला मुहूर्त मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्ककडा : बीड - जामखेड - नगर राज्य महामार्गावर अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अरुंद रस्ते झाल्याने अपघात वाढले आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत अशी मागणी झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने नावाला चार वेळा मोजणी केली. अतिक्रमण हटविण्याचा हा बार फुसका गेल्याने ती काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त मिळेल का ? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.आष्टी तालुक्यातुन कडा मार्गे जाणाऱ्या बीड - जामखेड - नगर राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तत्कालिन जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी राज्य महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत असे आदेश दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल चार वेळा मोजणी करून घेतली आणि अतिक्रमणे केलेल्या लोकांना नोटीसा बजावल्या होत्या. पण पुढे काहीच उपाययोजना राबवल्या गेल्या नसल्याने ही अतिक्रमणे आता पक्की झाली आहेत. याचा फटका वाहनधारक व प्रवासी वर्गाला सोसावा लागत आहे.राज्य महामार्गावरील केलेली ही अतिक्रमणे काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग उदासिनता दाखवत असून, आणखी किती बळी गेल्यावर महामार्गावरील अतिक्रमणे काढणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही अतिक्रमणे तात्काळ काढावीत नसता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे संभाजी ब्रिगेड आष्टी तालुका अध्यक्ष प्रा.भागचंद झांजे यांनी सांगितले आहे.याबाबत आष्टी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए.पी. जोरवेकर म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग लवकरच होणार असून ही सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे.येथे आहेत अतिक्रमणेबीड - जामखेड - नगर राज्य महामार्गावर अडथळा निर्माण केलेल्या तसेच चिंचपूर, मातकुळी, पांढरी, हरियाणा आष्टा फाटा, आष्टी, कासारी, कडा कारखाना, जळगाव, वटनवाडी, शेरी, कडा, साबलखेड, धानोरा, बाळेवाडी फाटा, वाघळूज, नांदूर विठ्ठलाचे या ठिकाणी अतिक्रमणे केलेल्या ११०० लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पण अतिक्रमणे हटविण्यात नेमका अडथळा कशाचा निर्माण होतो हेच कळत नाही. या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर टोलेजंग इमारती उभ्या असल्याने हे काढताना मोठे राजकारण आडवे येत आहे.

टॅग्स :BeedबीडEnchroachmentअतिक्रमणpwdसार्वजनिक बांधकाम विभाग