शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बीड जिल्ह्यात कापसावर पुन्हा बोंडअळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:49 IST

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून कापूस पिकांवर बोंडअळीचे संकट घोंगावत आहे. यावर्षी देखील कापूस पिकावर बोंडअळीने हल्ला केला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाकडून बांधावर जाऊन मार्गदर्शन : योग्य नियोजन केल्यास अळीचे नियंत्रण; शेतकरी धास्तावला

बीड : जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून कापूस पिकांवर बोंडअळीचे संकट घोंगावत आहे. यावर्षी देखील कापूस पिकावर बोंडअळीने हल्ला केला आहे. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केले तर बोंडअळी नियंत्रणात येऊ शकते यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती विविध माध्यमातून तसेच बांधावर जाऊन जनजागृती केली जात आहे.मागील दोन वर्ष दुष्काळी परिस्थिती तसेच यावर्षी पिके बहरात असताना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमधून कापूस काही ठिकाणी चांगल्या स्थिती आहे. परंतु वेचणीची सुरुवात होताच बोंडअळीने कापसावर हल्ला केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी पासाचा कालावधी वाढल्यामुळे बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. कोषातून बाहेर पडलेल्या पतंगाचे मिलन होऊन त्यांनी पानावर अंडी घातल्यानंतर ८ ते १० दिवसांनी या किडीचा प्रादुर्भाव हिरवी बोंडे व पात्यांवर होते. त्यामुळे कापूस उत्पादनात घट होते. यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले आहे. तसेच तालुकास्तरावरील अधिका-यांनी कार्यक्षेत्रातील शेतकºयांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या कराव्यात उपाययोजनाकापूस पीक असेलल्या क्षेत्रात एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. त्याची सतत ३ दिवस पाहणी करावी. त्यामध्ये ७ ते ८ पतंग आढळून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अ‍ॅझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.बोंडे, पात्या, फुले यामध्ये प्रादुर्भाव ५ ते १० टक्के असल्यास इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के प्रवाही १० मिली किंवा थायेडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा लेंमड सायहॅलोथ्रीन ४.९ सीएम, १० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के एएफ २५ मिली क्लोरीपायरीफॉस २० टक्के प्रवाई २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव १० टक्क्यांपेक्षा जास्त आढळून आला तर इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के दाणेदार ४ ग्रॅम किंवा बाजारात उपलब्ध मिश्र किटकनाशके जसे की प्रोफेनोफॉस ४० टक्के अ सायपरमेथ्रीन ४ टक्के २० मिली किंवा डेल्टामेथ्रीन १ अ ट्रायझोफॉस ३५ टक्के प्रवाही १२.५० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस ५० अ सायपरमेथ्रीन ५ टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावी. शेतक-यांनी फवारणी करताना काळजी घ्यावी असे आवाहन बीड तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे.शेतक-यांनी फरदडचा मोह टाळणे अतिआवश्यकशेतक-यांनी शेतातील बोंडअळीचे प्रादुर्भावाचे प्रमाण लक्षात घ्यावे, त्यासाठी योग्य ते नियोजन करावे. या कालावधीत कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर पुन्हा अंदाज घेऊन उपाययोजना कराव्यात. डिसेंबर २०१९ या महिना अखेर शेतातील कापूस पीक अंदाजानुसार काढून टाकावे. पुढील हंगामातील बोंडअळी नियंत्रणासाठी फरदड घेण्याचा मोह टाळून शेतातील कापूस बांधावर जाळून नष्ट करावा.

टॅग्स :BeedबीडcottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र