शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षांच्या मुलीसह शिक्षिकेचा मृतदेह आढळला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:36 IST

नांदूरघाट (ता. केज) : दोन दिवसांपूर्वी माहेरी आलेल्या शिक्षिकेचा मृतदेह तिच्या दीड वर्षांच्या चिमुकलीसह विहिरीत आढळून आला. काेरोनाने ...

नांदूरघाट (ता. केज) : दोन दिवसांपूर्वी माहेरी आलेल्या शिक्षिकेचा मृतदेह तिच्या दीड वर्षांच्या चिमुकलीसह विहिरीत आढळून आला. काेरोनाने पतीचे निधन झाल्यामुळे शिक्षिका विरहात होती. माय-लेकीच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे. दरम्यान, मातृप्रेम किती घट्ट असते, याचा प्रत्यय बाणेगावच्या (ता. केज) ग्रामस्थांना १६ रोजी आला. विहिरीतील पाणी उपसल्यानंतर आईच्या कडेवर लेक अन् लेकीचा आईच्या हातात हात होता... हे चित्र पाहून उपस्थितांना गहिवरुन आले. आशा सुंदर जाधवर (२२) व शांभवी सुंदर जाधवर (१८ महिने) अशी त्या माय-लेकींची नावे आहेत. आशा यांचे बाणेगाव हे माहेर असून, त्यांचा विवाह सुंदर जाधवर (रा. वडजी, ता. वाशी, जि. उस्मानबााद) यांच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. आशा व सुंदर हे दोघेही शिक्षक होते. ते पुण्यात वास्तव्यास होते. वर्षभरापूर्वी सुंदर यांना कोरोनाची लागण झाली, यातच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पतीच्या जाण्याने आशा सैरभर झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या मुलगी शांभवीसह माहेरी बाणेगावला आल्या. १६ सप्टेंबर रोजी वडील बाहेरगावी गेले होते, तर आई शेतीकामात व्यस्त होती. दुपारी ४ वाजता मुलगी शांभवीला कडेवर घेऊन आशा शेतात गेल्या. यावेळी खेळता - खेळता मुलगी विहिरीजवळ गेली. तिचा तोल गेल्याने धावत जाऊन आशा यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघींचाही बुडून मृत्यू झाला.

....

एकाच चितेवर अंत्यसंस्कार

केज ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शंकर वाघमोडे, उपनिरीक्षक दादासाहेब सिध्दे, जमादार जसवंत शेप, रशीद शेख यांनी धाव घेतली. १६ रोजी रात्री उशिरा माय-लेकीचे मृतदेह नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात पाठविले. १७ रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. सकाळी ११ वाजता माय-लेकीवर एकाच चितेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. कुटुंंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांनाही हुंदके आवरता आले नाहीत. नातेवाईकांचे जबाब बाकी असून, अधिक तपास सुरू असल्याचे सहाय्यक निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितले.

....

पाच पंपांद्वारे उपसले पाणी

आशा व शांभवी या माय-लेकी गायब झाल्याने शोधाशोध सुरु झाली. सायंकाळी सहा वाजता विहिरीच्या काठावर आशा यांची चप्पल आढळली. त्यामुळे त्या दोघी विहिरीत पडल्याची शक्यता गृहीत धरुन तरुणांनी विहिरीत उड्या घेतल्या. मात्र, विहीर पाण्याने तुडूंब भरलेली असल्याने पाच विद्युतपंपांद्वारे पाणी उपसा सुरु झाला. रात्री साडेअकरा वाजता पाणी उपसा केल्यावर माय-लेकीचे मृतदेह आढळून आले. यावेळी आशा यांच्या कडेवर मुलगी शांभवी होती, तर शांभवीचा हात आईच्या हातात होता.

....