शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह अवहेलना प्रकरण : आरोग्य विभाग म्हणतोय, कोरोनाबाधित महिलेची अनावधाने विसरली नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 19:15 IST

गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील लता सुरवसे या महिलेला २१ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर २४ दिवस कोरोनाबाधित म्हणून उपचार करण्यात आले व तिचा १७ मे रोजी मृत्यू झाला.

ठळक मुद्दे चौकशी समितीच्या अहवालातून अनेक धक्कादायक प्रकार उघडमृत्यूनंतर तिची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली.

बीड : महिलेच्या मृत्यूनंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने नातेवाईक मृतदेह घेऊन गेले. मात्र, ही महिला बाधित असून मृतदेह पळविला, असा आरोप करत नातेवाईकांवर गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने आरोग्य विभागाने आता कोलांटउडी मारली असून, ही महिला कोरोनाबाधित होती, परंतु अनावधनाने नोंद करण्यास विसरल्याचे सांगितले आहे. चौकशी समितीच्या अहवालातून हा प्रकार स्पष्ट झाला.

गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील लता सुरवसे या महिलेला २१ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर २४ दिवस कोरोनाबाधित म्हणून उपचार करण्यात आले व तिचा १७ मे रोजी मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यामुळे नातेवाईक मृतदेह घेऊन गावी गेले. मात्र, नंतर आरोग्य विभागाने कॉल करून नातेवाईकांना मृतदेह परत आणण्यास सांगितले. त्यानंतर बीडमध्ये अंत्यसंस्कार झाले, परंतु तरीही आरोग्य विभाग शांत न राहता परिचारिकेला पुढे करत नातेवाईकांवर मृतदेह पळविल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी आतापर्यंत सुरू होती.

दरम्यान, यात डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, नातेवाईक यांचे जबाब घेण्यात आले. याचा अहवाल तयार करून समितीने जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अहवाल सादर केला. यात परिचारिका व डॉक्टरांचा योग्य संवाद झाला नाही, नातेवाईकांच्या दबावापाेटी चाचणी केली, तसेच या महिलेची यापूर्वीच ॲंटिजन चाचणी केली होती, परंतु त्याची नोंद अनावधानाने विसरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यात अनेक तफावत असून आरोग्य विभागाच्या अंगलट हे प्रकरण येणार असल्याने यातून पळवाटा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सीएस आणि समितीवरही संशयप्रकरण गंभीर असतानाही समितीने अहवाल देण्यास उशीर केला. तसेच कागदपत्रांची पाहणी न करताच केवळ जबाब घेऊन अहवाल दिल्याने व अहवाल प्राप्त होऊनही तात्काळ निर्णय न घेतल्याने जिल्हा शल्यचिकित्सकही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

महिलेची चाचणीच नाहीलता सुरवसे रुग्णालयात दाखल झाल्यापासून कोरोना चाचणीच झालेली नाही. झाली असती तर चाचणीचा सॅम्पल आयडी समितीपुढे का सादर केला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील ८६ हजार बाधितांची नोंद होते आणि याच महिलेची का विसरते? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.

चौकशी समितीचा अहवाल आला आहे. यात या महिलेची ॲंटिजन चाचणी केली होती, परंतु, अनावधानाने नोंद राहिल्याचे दिसते. तसेच अनेक मुद्दे आहेत. यावर लवकरच निर्णय घेऊ.- डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूBeedबीड