शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना साम्राज्यवादी ब्रिटिशांनी २३ मार्च १९३१ रोजी फासावर दिले होते. त्यावेळी या शहीदांचे वय पंचवीस सुद्धा नव्हते. मात्र त्यांनी आपल्या बलिदानातून एक प्रेरणादायी संदेश या देशातील तरुणांना, शेतकऱ्यांना आणि कामगारांना दिलेला आहे. देशाच्या ७५ वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही आज फारशी परिस्थिती बदललेली नाही. म्हणून या शहीदांचे मार्गदर्शन आणि त्यांचे स्मरण करून देशांमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्यासाठी तरुण वर्गाने पुढाकार घेतला पाहिजे, अशा प्रकारचे वक्तव्य रक्तदान शिबीरप्रसंगी प्रा. डॉ. सतीश सोळुंके यांनी केले.
यावेळी कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. ज्योतीराम हुरकुडे, कॉ. भाऊराव प्रभाळे, कॉ. रामहरी मोरे, ॲड. प्रशांत दगडखैर, कॉ. संजय इंगोले, ॲड करुणा टाकसाळ, कॉ. दत्ता भोसले, कॉ. भीमराव चव्हाण इत्यादी उपस्थित होते. त्याबरोबरच ऑटो रिक्षा युनियनच्या वतीने युनियनचे अध्यक्ष कॉ. शेख सलीम, कॉ. हनुमान गाडे, कॉ. मनोहर कदम, शेख फिरोज, सुमित झाडीवाले, दीपक ठाकूर, मधुकर सांगोळे, देवा गव्हाणे, सतीश पवार इत्यादी सदस्यांची उपस्थिती होती. रक्तपेढीच्या वतीने डॉ. रेश्मा गवते, शेख मोहम्मद रियाज, अनिल श्रीधरराव टाक आणि दादाराव हुमकर यांची मदत झाली. रक्तदाना सहित शहीदांचे कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
===Photopath===
230321\232_bed_20_23032021_14.jpg
===Caption===
कार्यक्रमात रक्दारन करताना पदाधिकारी