लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांची आर्थिक स्थिती खालावलेली असताना महावितरणने वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाढीव वीज बिले दिली. आता या वीज बिलांची सक्तीने वसुली सुरू आहे. ही सक्तीची वसुली थांबवा व शासनाने हे संपूर्ण वीज बील माफ करावे. या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वीज बिल माफ करा, अशा घोषणा देण्यात आल्या. सक्तीने होत असलेल्या वसुलीचा यावेळी निषेध नोंदविला.
या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी, नगरसेवक सारंग पुजारी, डॉ. अतुल देशपांडे, मधुकर काचगुंडे, शेख खलील मौलाना, सुरेश कऱ्हाड, अनंत लोमटे, कमलाकर कोपले, दिलीप काळे, बालाजी पाथरकर, डॉ. निशिकांत पाचेगावकर, संजय गंभिरे, जीवन किर्दंत, प्रशांत आदनाक, अॅड. संतोष लोमटे, शैलेश कुलकर्णी, हिंदूलाल काकडे, महादू मस्के, नूर पटेल, पंडित जोगदंड यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
--------