शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

बीडमध्ये कमळाने विस्कटली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘घडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 16:30 IST

विरोधकांच्या जातीय राजकारणाला प्रीतम मुंडे यांचा ‘हाबाडा’

ठळक मुद्दे१९९६ पासून पोटनिवडणुकीसह सातव्यांदा भाजपची बाजी  धनंजय मुंडेंनाही जोरदार धक्का

- सतीश जोशी

वडिलांच्या पावलावर मजबूत पाऊल ठेवून डॉ. प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात सातव्यांदा भाजपाचे कमळ फुलविताना राष्ट्रवादी काँग्रेसची ‘घडी’ विस्कटून टाकली. २००४ चा अपवाद वगळता १९९६ पासून पोटनिवडणुकीसह सातव्यांदा भाजपने बीडची जागा सहज जिंकली आहे. २००९ आणि १४ मध्ये गोपीनाथराव मुंडे यांनी तर २०१४ च्या पोटनिवडणुकीसह डॉ. प्रीतम यांनी विक्रमी मताधिक्याने २०१९ ची निवडणूक जिंकून विरोधकांच्या जातीय राजकारणाला चांगलाच ‘हाबाडा’ दिला. 

या निवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांनी ५०.१५ टक्के मते घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा जवळपास १ लाख ६८ हजार ३६६ मतांनी दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर प्रचारात जातीयवाद पाहावयास मिळाला. परंतु मतदारांनी मात्र सर्व जातीय समीकरणे मोडीत काढली. भाजपाच्या विजयात जिल्ह्यातील विकास कामासोबतच मोदी फॅक्टरच महत्त्वाचा ठरला. २०१४ च्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे ह्या विक्रमी ७ लाख मताधिक्क्याने विजयी झाल्या होत्या. २००९ आणि १४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे हे जवळपास १ लाख ४० हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. पोटनिवडणुकीसह ही निवडणूक जिंकून  प्रीतम यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले. 

लागोपाठ चौथ्यांदा मुंडे घराण्याने ही लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. १९५२ पासून ते २०१९ पर्यंत बीड लोकसभा मतदारसंघासाठी १८ निवडणुका झाल्या. यापैकी ७ वेळा काँग्रेस, २ वेळा कम्युनिस्ट पक्ष, १ वेळा राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल आणि ७ वेळा भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक जिंकली आहे. १९९६ पासून झालेल्या ८ पैकी ७ निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत. या निवडणुकीत केज विधानसभा मतदारसंघात २८ हजार, परळी १८,९१९, बीड ६,२६२, आष्टी ७० हजार ४४, गेवराई ३४ हजार ४८८, तर माजलगावमध्ये प्रीतम मुंडे यांना १९ हजार ७१६ मताधिक्य मिळाले. या निवडणुकीत २६ अपक्ष रिंगणात उतरले होते. संपत चव्हाण यांनी १६ हजार ७७० मते घेतली. इतर अपक्षांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. या मतदारसंघात ‘नोटा’ ची मते २४८७ इतकी होती. 

भाजपत सुसंवाद, राष्ट्रवादीचे एकला चला रेभाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सोडून इतर ३४ उमेदवारांना पडलेल्या एकूण मतांची संख्या १ लाख ६१ हजार ९१७ इतकी आहे. भाजपच्या प्रचारात नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांत सुसंवाद होता. याउलट राष्ट्रवादीची यंत्रणा ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत दिसली. अंतर्गत गटबाजीनेही राष्ट्रवादीच्या पराभवास हातभार लावला. पंकजा आणि प्रीतम भगिनींनी  पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचे राजकारण चालू दिले नाही.

स्कोअर बोर्डप्रीतम मुंडे यांना ६ लाख ७८ हजार १७५, तर बजरंग सोनवणे यांना ५ लाख ८ हजार ८०९ (३७.७ टक्के) मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे ९२ हजार १३९  (६.८१ टक्के) मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोनवणे आणि जाधव, अपक्ष संपत चव्हाण (१६७७१), मुजीब इनामदार (६१४१) हे चौघे वगळता इतरांना चार हजाराच्या पुढे मते घेता आली नाहीत. 

टॅग्स :beed-pcबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल