शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुलास जाळून मारणाऱ्या पित्यास जन्मठेप; माजलगाव न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:20 IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला पेटवून दिले. तिने कशीबशी सुटका केली. त्यानंतर पोटच्या सात वर्षाच्या मुलालाही पेटविले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात पित्याला दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल माजलगाव येथील अप्पर सत्र न्या. ए.एस.वाघमारे यांनी बुधवारी दिला.

ठळक मुद्देपत्नीलाही पेटवून देत जिवे मारण्याचा केला होता प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला पेटवून दिले. तिने कशीबशी सुटका केली. त्यानंतर पोटच्या सात वर्षाच्या मुलालाही पेटविले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात पित्याला दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल माजलगाव येथील अप्पर सत्र न्या. ए.एस.वाघमारे यांनी बुधवारी दिला.सुरेश जयद्रथ मस्के (सोनवळा ता. अंबाजोगाई) असे या निर्दयी पित्याचे नाव आहे. सुरेश हा त्याची पत्नी विद्या हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच त्याने २६ मे २०१६ रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरेशच्या तावडीतून सुटका करीत विद्या घराबाहेर धावली. त्यानंतर सुरेशने आपला पोटचा सात वर्षाचा मुलगा यश यालाही पेटविले. यामध्ये तो ८५ टक्के भाजला होता. दुसºया दिवशी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर विद्या यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात कलम ३०७, ३०२, ४९८ अ, १२० ब सह कलम ३४ भादंवि प्रमाणे सुरेशविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. एम. तडसे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.त्यानंतर अ‍ॅड. अजय तांदळे यांनी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी असणारी आई विद्या व वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. जी.पवार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. तसेच यशचा मृत्यूपूर्व जबाबही शिक्षा लागण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. याच पुराव्यावरून अप्पर न्या. ए.एस.वाघमारे यांनी सुरेश मस्के याला दोषी ठरवित यशला जाळून मारल्याप्रकरणी कलम ३०२ नुसार जन्मठेप व पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली. पत्नी विद्या हिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०७ नुसार दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद तसेच जाच, जुलूम केल्याप्रकरणी कलम ४९८ अ प्रमाणे दोषी ठरवून दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपयांचा दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे वरिष्ठ सहायक सरकारी वकील अजय तांदळे यांनी काम पाहिले. त्यांना सहा. सरकारी वकील आर. ए. वाघमारे व अ‍ॅड. प्रमोद भोले यांनी सहकार्य केले.यशचा मृत्यूपूर्व जबाब महत्वपूर्णजन्मादात्यानेच पेटवून दिल्याने यश हा सात वर्षीय मुलगा रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. याचवेळी पोलिसांनी त्याचा जबाब घेतला. जबाबात यशने स्वत: स्वाक्षरीही केली होती. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये त्याने जगाचा निरोप घेतला होता.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालय