शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम क्लोनिंग प्रकरणात बिहारी टोळी जेरबंद; राज्यातील अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 20:20 IST

राज्यातील विविध ठिकाणी क्लोनिंग करून या भामट्यांनी नागरिकांच्या खात्यातून रक्कम लांबविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बीड : एटीएम कार्ड क्लोन करून त्याद्वारे खात्यातील पैसे काढणारी परराज्यांतील टोळी बीड सायबर विभागाने ९ फेब्रुवारीला ताब्यात घेतली. त्यांना ११ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता, आरोपींना १६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तसेच तपासामध्ये राज्यातील इतर गुन्हेदेखील उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

बिरू राजेंद्र पांडे (रा. मायापूर, जि. गया), सतीशकुमार नंदलाल प्रसाद (रा. बडकी, जि. गया), मोहम्मद असद नसीम खान (रा. मंजोलीगाव, जि. गया, ह. मु नालासोपारा मुंबई), मोहम्मद जावेद जब्बार खान (रा. मंजोलीगाव, जि. गया) अशी आरोपींची नावे आहेत. एटीएम कार्डमधून पैसे काढून घेतल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणाचा तपास बीड सायबर विभाग करत होता. त्यांनी तांत्रिक पुराव्यावरून आरोपी निष्पन्न केले होते. मात्र, बिहारमध्ये जाऊन आरोपींना अटक करणे कोरोनामुळे शक्य नव्हते. मात्र, आरोपींच्या हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष होते. 

यादरम्यान आरोपी शिर्डी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे एटीएम क्लोनिंग करण्यासाठी लागणारे साहित्य मिळाले, तसेच त्यांनी गुन्हादेखील कबूल केला. त्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सायबर विभागाचे प्रमुख पो.नि. रवींद्र गायकवाड हे करत आहेत.

बीडमधील सर्व लॉजची केली होती तपासणीमागील वर्षी डिसेंबर २०२०मध्ये हे आरोपी बीडमध्ये आले होते. त्यांनी शहरातील व इतर ठिकाणच्या काही भागांत एटीएम मशीनला क्लोनिंग करणारे यंत्र बसवून एटीएमची माहिती मिळवली होती, तसेच ज्या एटीएम मशीनला क्लोनिंग यंत्र बसविले आहे. त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या मागे उभा राहून त्याचा पिननंबर पाहिला जात होता. त्यानंतर बनावट एटीम कार्ड तयार करून खात्यातील रक्कम लंपास केली जात होती, अशी माहिती सायबर विभागाने दिली.

राज्यातील इतर गुन्हे होतील उघडराज्यातील विविध ठिकाणी क्लोनिंग करून या भामट्यांनी नागरिकांच्या खात्यातून रक्कम लांबविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इतर कोणत्या शहरात असा गैरप्रकार करून पैसे लांबविले आहेत, याचा तपास बीड पोलीस करत आहेत. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमatmएटीएमBeedबीड